एमसीएचं शरद पवार अकादमी नामकरण बेकायदा?

  Pali Hill
  एमसीएचं शरद पवार अकादमी नामकरण बेकायदा?
  मुंबई  -  

  मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीए मैदानाचे शरद पवार क्रिकेट अकादमी असे नामकरण काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र हे नामकरण बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नामकरणासाठी बीकेसीची विशेष नियोजित प्राधीकरण असणाऱ्या एमएमआरडीएची परवानगी घेणे बंधनकार होते. मात्र एमसीएने अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती एमएमआरडीएच्या नगर आणि क्षेत्र नियोजन विभागाने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

  मैदानाचे नामकरण करण्यासाठी विभागाकडे कोणताही विनंती प्रस्ताव एमसीएकडून एमएमआरडीएकडे आलेला नाही. त्यामुळे पुढे परवानगीचा प्रश्नच उद्भभवत नाही. मुळात शैक्षणिक वापरासाठी देण्यात आलेल्या भूखंडाचा व्यावसायिक वापर होत असल्याने हे मैदान आधीच वादात अडकले आहे. यासंदर्भात एमएमआरडीएने एमसीएला जून 2015 मध्ये नोटीसही बजावली आहे. असे असताना आता नामकरणही परवानगी न घेताच केल्याने वादात आणखी ठिणगी पडणार आहे. दरम्यान सुब्रतो रॉय यांच्या नावे पुण्यातील एका स्टेडियमला देताना ज्याप्रकारे 100 कोटींची रक्कम सरकारने वसूल केली होती, त्याप्रमाणे एमसीएवरही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.