केदार जाधवची अायपीएलमधून माघार

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज अाणि पहिल्या सामन्यातील विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या केदार जाधवने हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे अायपीएलमधून माघार घेतली अाहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला अाहे. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात १३व्या षटकांत केदार जाधवला दुखापत झाली होती. मात्र अखेरच्या षटकांत पुन्हा फलंदाजीला येत त्यानं चेन्नईच्या विजयावर मोहोर उमटवली होती.

ग्रेड-२ ची दुखापत

मुंबई इंडियन्सवरील विजयानंतर केदार जाधव महिनाभरात बरा होईल, अशी अाशा फ्रँचायझीला होती. मात्र ग्रेड-२ची ही दुखापत असल्यामुळे चेन्नईला दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागणार अाहे. चेन्नईने केदार जाधववर ७.८० कोटी रुपयांची बोली लावली होती.

केदारने संपूर्ण अायपीएलमधून माघार घेतली अाहे, ही अामच्यासाठी दुर्दैवी बाब अाहे. त्याच्या दुखापतीचा एमअारअाय स्कॅन केल्यानंतर ग्रेड-२ची दुखापत असल्याचे समोर अाले. त्याच्या जागी अाम्ही बदली खेळाडूची निवड केली नसली तरी त्या प्रक्रियेतून अाम्हाला जावेच लागणार अाहे. केदार हा मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू असल्यामुळे हे नुकसान अाम्हाला भरून काढता येणार नाही.

- माइक हसी, चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक

अंबाती रायडूला मिळणार संधी

सीएसकेने त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड केलेली नाही. मात्र अाता मधल्या फळीत अंबाती रायडूला संधी मिळण्याची शक्यता अाहे. फॅफ डू प्लेसिसच्या अनुपस्थितीत शेन वाॅटसनच्या साथीने रायडूने डावाची सुरुवात केली होती.


हेही वाचा -

वानखेडेवरील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना पाणीकपातीचा फटका?

अायपीएलमुळे मुंबई क्रिकेटला उतरती कळा - लालचंद राजपूत यांची टीका

पुढील बातमी
इतर बातम्या