Advertisement

अायपीएलमुळे मुंबई क्रिकेटला उतरती कळा - लालचंद राजपूत यांची टीका


अायपीएलमुळे मुंबई क्रिकेटला उतरती कळा - लालचंद राजपूत यांची टीका
SHARES

४१ वेळा रणजी करंडक पटकावणाऱ्या मुंबईने अातापर्यंत देशाला ७५ कसोटीपटू दिले अाहेत. त्यापैकी नऊ जणांनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली अाहे. मात्र मुंबई क्रिकेटची ही प्रतिष्ठा गेल्या काही वर्षांपासून धुळीस मिळत अाहे. गेल्या मोसमात मुंबईला रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. खेळाडूंना श्रीमंत बनवणाऱ्या अायपीएलमुळेच मुंबई क्रिकेटचा दर्जा घसरत चालला अाहे, अशी टीका भारताचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांनी केली अाहे.



पैशांमुळे खेळाडूंचा दृष्टीकोन बदलला

एमअायजी क्रिकेट क्लबवर झालेल्या 'द लायन्स अाॅफ मुंबई क्रिकेट’ या कार्यक्रमात लालचंद राजपूत यांनी खेळाडूंच्या मानसिकतेवर कडाडून टीका केली. सध्याचे मुंबईचे युवा क्रिकेटपटू मुंबई संघाकडून खेळण्याएेवजी अायपीएलमध्ये खेळण्याला प्राधान्य देतात. मुंबईनंतर देशाकडून क्रिकेट खेळल्यावर अापोअापच अायपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल, हे त्यांना कळत नाही. पैशांमुळे खेळाडूंचा दृष्टीकोन बदलत चालला अाहे. याच कारणामुळे मुंबई क्रिकेटला उतरती कळा लागली अाहे, अशी टीकाही त्यांनी केली. 



गुजरात, सौराष्ट्रचे दिले उदाहरण

अामच्या काळात गुजरात, सौराष्ट्रसारखे छोटे संघ अामच्यासमोर दोन दिवसही मैदानावर तग धरू शकायचे नाही. अाता तेच संघ मुंबईला कडवी लढत देत अाहेत अाणि मुंबईला पराभूत करत अाहेत. मुंबईला सहज हरवू शकतो, हा अात्मविश्वास त्यांच्यात बळावला अाहे. नॅशनल क्रिकेट अकादमीतील (एनसीए) प्रशिक्षण अाणि अायपीएलमुळे त्यांच्या क्रिकेटमध्ये सुधारणा झाली अाहे, असे उदाहरणही राजपूत यांनी दिले. 



अभिषेक नायरचेही टीकास्त्र

अाता अायपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्याच्या निकषावर भारतीय संघात निवड करण्याचा ट्रेंड झाला अाहे, अशी टीका मुंबईचा कर्णधार अभिषेक नायरने केली. तो म्हणाला, सिद्धेश लाड, श्रेयर अय्यरसारखे मुंबईकर क्रिकेटपटू रणजी ट्राॅफीत चांगली कामगिरी करतात, पण त्यांना भारतीय संघात स्थान मिळत नाही. तोच रिषभ पंतसारखा खेळाडू अायपीएलमध्ये चमकतो अाणि भारतीय संघामध्ये स्थानही मिळवतो.


हेही वाचा -

अायपीएलमध्ये खेळण्यासाठी पार करावी लागणार यो-यो टेस्ट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा