Advertisement

अायपीएलमध्ये खेळण्यासाठी पार करावी लागणार यो-यो टेस्ट


अायपीएलमध्ये खेळण्यासाठी पार करावी लागणार यो-यो टेस्ट
SHARES

भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी जायबंदी खेळाडूंना यो-यो टेस्टला सामोरं जावं लागत असे. ही टेस्ट पार केल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला भारतीय संघात प्रवेश दिला जात नसे. अाता हाच फाॅर्म्युला अायपीएलमध्येही राबविला जाणार अाहे. मुंबई इंडियन्स अाणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या सामन्याद्वारे अायपीएलच्या ११व्या पर्वाला सुरुवात होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स खेळाडूंची यो-यो टेस्ट करणार असल्याचे समजते.


या संघांचीही पसंती

इतकंच नव्हे तर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्स इलेव्हन पंजाब अाणि राजस्थान राॅयल्स या संघांनीही अापल्या खेळाडूंची यो-यो टेस्ट केली अाहे. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स अाणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी मात्र परंपरागत फिटनेस चाचणीलाच प्राधान्य दिले अाहे.


मुंबई इंडियन्सची यो-यो टेस्ट पार

मुंबई इंडियन्सने सराव शिबिरादरम्यान अापल्या खेळाडूंची यो-यो टेस्ट केल्याचे समजते. संघातील प्रत्येक खेळाडूला यो-यो टेस्टचा प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी १४.५ सेकंदांचा वेळ दिला जात होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही खेळाडूंची यो-यो टेस्ट केल्याचे समजते. यावेळी खेळाडूंच्या फुफ्फुसाची शक्तीही तपासण्यात अाली.


जगभरातील अांतरराष्ट्रीय संघांनी फिटनेससंदर्भात अाखलेले निकष अाता अापल्या खेळाडूंनीही जपावेत, यासाठी अायपीएलमधील प्रत्येक संघ अाग्रही अाहे. भारतीय संघाने अाता यो-यो टेस्ट अनिवार्य केली अाहे. त्यामुळे अायपीएल संघांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवणं स्वाभावीक अाहे. प्रत्येक खेळाडूने तंदुरुस्तीच्या बाबतीत असलेले निकष पार करणं महत्त्वाचं अाहे.
- अायपीएल संघातील सदस्य


काय अाहे यो-यो टेस्ट?

कर्णधार, प्रशिक्षक अाणि सपोर्ट स्टाफ यांच्या शिफारशीनुसार यो-यो टेस्टचे निकष बनवण्यात अाले अाहेत. प्रत्येक खेळाडूसाठी ही टेस्ट पार करणे बंधनकारक अाहे. या टेस्टमध्ये खेळाडूंना जाॅगिंग अाणि धावण्याची कसोटी पार करावी लागते. अनेक २० मीटरपर्यंत दोन रेषा बनवल्या जातात. खेळाडू रेषेच्या मागे उभा असतो. सूचना मिळताच तो धावू लागतो. खेळाडू सतत दोन रेषांमध्ये तो धावत असतो. बीप वाजताच त्यानं वळायचं. प्रत्येक एका मिनिटाला वेग वाढत जातो. वेळेत सीमारेषा पार केली नाही तर आणखी २ बीपमध्ये वेग पकडायचा असतो. खेळाडूने रेषेच्या दोन्ही टोकापर्यंत वेग न पकडल्यास त्याची चाचणी थांबवण्यात येते. ही पूर्ण चाचणी सॉफ्टवेअरवर अवलंबून आहे. 


हेही वाचा -

अायपीएलचं उद्घाटन अाणि अंतिम सामनाही मुंबईत

अाता अायपीएलमध्ये डीअारएसच्या अवलंब होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा