Advertisement

मुंबई इंडियन्सचा सरावाचा श्रीगणेशा


मुंबई इंडियन्सचा सरावाचा श्रीगणेशा
SHARES

गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं चौथ्यांदा अायपीएलचं जेतेपद पटकावण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली अाहे. अायपीएलच्या ११व्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सनं सरावाचा श्रीगणेशा केला अाहे. सध्या भारतीय खेळाडूच सरावात सहभागी झाले असून किराॅन पोलार्डसह सर्व परदेशी खेळाडू १ एप्रिलपासून संघात सामील होणार अाहेत. नवी मुंबईतील घणसोली येथील रिलायन्स काॅर्पोरेट पार्कमधील नव्याने विकसित करण्यात अालेल्या मैदानावर सध्या मुंबई इंडियन्सचा सराव सुरू अाहे. ३१ मार्चपासून मुंबई इंडियन्स संघ अापल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर सरावाला सुरुवात करणार अाहे.


१ एप्रिलला येणार परदेशी खेळाडू

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू किराॅन पोलार्ड याच्यासह न्यूझीलंडचा मिचेल मॅकक्लेनाघन, अाॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स तसेच बांगलादेशचा फिरकीपटू मुस्तफिझुर रहमानसह अन्य परदेशी खेळाडू १ ते ३ एप्रिलदरम्यान कधीही मुंबई इंडियन्स संघात सामील होणार अाहेत. अायपीएलला सुरुवात होण्याअाधी मुंबई इंडियन्सचा संघ दोन सराव सामनेही खेळणार असल्याचे समजते. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ७ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार अाहे.


हेही वाचा - 

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सवर भडकतो तेव्हा...

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं तिकीट ८०० रुपयांना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा