Advertisement

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सवर भडकतो तेव्हा...


रोहित शर्मा मुंबई इंडियन्सवर भडकतो तेव्हा...
SHARES

‘ये खेल हे वीर जवानों का’ या अायपीएलच्या ११व्या पर्वातील गाण्याने सर्वांना वेड लावलेले असतानाच अाता गतविजेत्या मुंबई इंडियन्सने संघातील खेळाडूंचे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला अाणले अाहेत. मात्र हे नवे इमोजी पाहून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा अापल्या प्रशासनावर चांगलाच वैतागला अाहे. कुणाला विचारून तुम्ही हे इमोजी बनवलेत, असा सवाल रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाला विचारला अाहे.


मुंबई इंडियन्स दरवर्षी अापल्या चाहत्यांना अाकर्षित करण्यासाठी नवनवी शक्कल लढवत असते. यावर्षीही मुंबई इंडियन्सने खेळाडूंच्या भावना व्यक्त करणारे इमोजी तयार केले अाहेत. मुंबई इंडियन्सने अापल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले अाहे की, ‘पलटन, अाता तुमच्यासमोर नवं काही सादर करण्यासाठी उत्सुक अाहे. अामच्या संघातील नव्या चेहऱ्यांचे स्वागत करण्यासाठी तयार रहा. लवकरच येत अाहोत. क्रिकेट मेरी जान'


 या नव्या घडामोडीविषयी मुंबई इंडियन्सचे चाहते उत्सुक असले तरी कर्णधार रोहित शर्मा मात्र नाराज झाला अाहे. या नव्या चेहऱ्यांबाबत खुलासा करण्यास रोहितनं अापल्या फ्रँचायझींना सांगितलं अाहे. हे नवे चेहरे काय अाहेत? तुम्हाला मला कळवता अालं नाही का? अशा शब्दांत रोहितनं ट्विट केलं अाहे.


 

रोहितच्या या अनपेक्षित नाराजीमुळं मुंबई इंडियन्सनं लगेच ट्विट करत रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या 'डायरेक्ट मॅसेज’ या वेबसाइटवर याविषयी चर्चा करण्याची विनंती केली अाहे. ‘कर्णधार, कृपया तुम्ही डायरेक्ट मॅसेजवर याविषयी चर्चा करा,’ असं ट्विट मुंबई इंडियन्सनं केलं अाहे.

 

हेही वाचा -

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं तिकीट ८०० रुपयांना

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, बेहरेनडाॅर्फच्या जागी मिचेल मॅकक्लेनाघन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा