Advertisement

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, बेहरेनडाॅर्फच्या जागी मिचेल मॅकक्लेनाघन


मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, बेहरेनडाॅर्फच्या जागी मिचेल मॅकक्लेनाघन
SHARES

अायपीएलच्या ११व्या पर्वाला सुरुवात होण्याअाधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला अाहे. मुंबई इंडियन्सचा खेळाडू जेसन बेहरेनडाॅर्फ याने पाठीच्या दुखण्यामुळे माघार घेतली अाहे. बेहरेनडाॅर्फ पहिल्यांदाच अायपीएलमध्ये खेळणार होता. पण पाठीच्या दुखण्यामुळे त्याचं हे स्वप्न अाता पूर्ण होऊ शकणार नाही. विशेष म्हणजे, बेहरेनडाॅर्फवर मुंबई इंडियन्सने अायपीएलच्या लिलावात १.५ कोटी रुपयांची बोली लावली होती. अाता त्याच्या जागी न्यूझीलंडच्या मिचेल मॅकक्लेनाघनची निवड करण्यात अाली अाहे. मॅकक्लेनाघनसाठी मुंबई इंडियन्सने १ कोटी रुपये मोजले अाहेत.


मॅकक्लेनाघन का?

न्यूझीलंडच्या मॅकक्लेनाघनवर या वर्षी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती. पण त्याच्याकडे अायपीएलमध्ये खेळण्याचा अाणि विशेष म्हणजे तीन वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा अनुभव अाहे. त्याने अातापर्यंत अायपीएलमधील ४० सामन्यांत ५४ विकेट्स मिळवल्या अाहेत. २०१७ मध्ये त्याने १९ विकेट्स मिळवल्या असल्या तरी तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार अाहे.

 

बीसीसीअाय काय म्हणते?

जेसन बेहरेनडाॅर्फ हा पाठीच्या दुखण्याने त्रस्त अाहे. त्यामुळे त्याने यंदाच्या अायपीएलमधून माघार घेतली अाहे. अाॅस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडाॅर्फ याच्या जागी मिचेल मॅकक्लेनाघनची निवड करण्यास अायपीएलच्या तांत्रिक समितीने परवानगी दिली अाहे. नियमानुसार, एखाद्या खेळाडूने माघार घेतल्यास त्याच्या जागी नोंदणी झालेल्या अाणि उपलब्ध खेळाडूंमधून क्रिकेटपटू निवडण्याची परवानगी मुंबई इंडियन्सला अाहे.

 

हेही वाचा -

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं तिकीट ८०० रुपयांना

लसिथ मलिंगा बनला मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी सल्लागार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा