Advertisement

लसिथ मलिंगा बनला मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी सल्लागार


लसिथ मलिंगा बनला मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी सल्लागार
SHARES

मुंबई इंडियन्स संघाचा एक अविभाज्य भाग असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा अाता नव्या भूमिकेत पाहायला मिळणार अाहे. यंदाच्या अायपीएलच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी सल्लागार म्हणून लसिथ मलिंगाची इनिंग पाहायला मिळणार अाहे. श्रीलंकेचा तेजतर्रार गोलंदाज मलिंगाने तब्बल ११० सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान केली अाहे.


असा असेल मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ


संघाप्रमाणेच मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफही तगडा अाहे. मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी श्रीलंकेचा महान फलंदाज महेला जयवर्धनेकडे सोपविण्यात अाली अाहे. अाता मलिंगा गोलंदाजी सल्लागाराच्या तर शेन बाँड हा गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. फलंदाजी प्रशिक्षकपद राॅबिन सिंगकडे तर नव्याने नियुक्त करण्यात अालेले क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपद जेम्स पेमेंट यांच्याकडे देण्यात अाले अाहे.


मुंबई इंडियन्ससोबत पुन्हा एकदा जोडला जाणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण अाहे. गेल्या दशकभरापासून मुंबई हेच माझे घर बनले होते. एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्ससोबतचा माझा प्रवास संस्मरणीय राहिला अाहे. अाता सल्लागार म्हणून मी नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे.
- लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी सल्लागार


हेही वाचा - 

अायपीएलचं उद्घाटन अाणि अंतिम सामनाही मुंबईत

होतकरू क्रिकेटपटूंनाे, रणजी, अायपीएल खेळण्यासाठी पैसे मोजू नका, नाही तर गंडवले जाल!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा