Advertisement

वर्दीत रिल्स अपलोड करणाऱ्या पोलिसांवर कारवाई

पोलिसांच्या या कृतीमुळे पोलिस दलाची प्रतिमा आणि शिस्त यावरही परिणाम होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वर्दीत रिल्स अपलोड करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
SHARES

वर्दी घालून समाज माध्यमावर रील्स, मिनी ब्लॉग्ज तसेच इतर व्हिडीओ अपलोड करणाऱ्या पोलिसांना (police) शिस्त लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधी राज्य शासनाने आणि नंतर पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत याबाबत सूचना देऊनही मुंबई पोलिस (mumbai police) दलातील अनेक पोलिस रील्स (reels) बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हे पोलिस प्रशासनाच्या रडारवर असून त्यांचा शोध घेऊन शिस्तभंगाची कारवाई (action) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांच्या या कृतीमुळे पोलिस दलाची प्रतिमा आणि शिस्त यावरही परिणाम होऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई (mumbai) पोलिस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात.

फेसबुक, इंस्टाग्रामसह इतर समाजमाध्यमांवर त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी वर्दीत काढलेली छायाचित्रे, व्हिडीओमधून अनेकदा कार्यालयीन परिसर, शासकीय संसाधने, वाहने आणि कार्यपद्धतीची माहिती अनवधानाने सर्वदूर पसरते.

त्यामुळे गोपनीयतेचा भंग होण्याची शक्यता आहे. तसेच पोलिस दलाची प्रतिमा आणि शिस्त यावरही परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत गुन्हे शाखेने विशेष शाखेस अशा पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले.

विशेष शाखेच्या पथकांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या पोलिसांचा माग सुरू केला आहे.

समाजमाध्यमांवर वर्दीत साहित्य प्रसारित करणाऱ्या अधिकारी, अंमलदारांविरोधात कारवाई करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी विशेष शाखेकडे देण्यात आली आहे.

पोलिस दल हे शिस्तीचे दल मानले जात असून अशाप्रकारे वर्तन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे समाज माध्यमांवर झळकण्याचा छंद लागलेल्या पोलिसांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे.



हेही वाचा

KEM रुग्णालयात IVF सेंटर सुरू

ठाण्यात रेबीज मुक्त मोहीमेनिमित्त कुत्र्यांना केले लक्ष्य

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा