1 सप्टेंबर 2026 पासून मुंबई (mumbai) महानगर क्षेत्रातील प्रवाशांना रिक्षा (auto) आणि टॅक्सी (taxi) प्रवासासाठी अधिक पैसे (fares) मोजावे लागतील.
सुधारित भाडे रचनेनुसार, रिक्षाच्या भाड्यात 1 रुपयाची, तर टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ होईल. हे नवीन दर मुंबईसह ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई यांसारख्या भागांतही लागू होतील.
या भाडेवाढीचा परिणाम दररोज रिक्षा आणि टॅक्सीने कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे. इंधन, देखभाल आणि परिचालन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता, वाहतूकदार अनेक दिवसांपासून भाडेवाढीची मागणी करत होते.
यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये भाड्यात सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये करण्यात आले होते, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये झाले होते.
या ताज्या वाढीमुळे प्रवाशांच्या, विशेषतः नियमितपणे रिक्षा आणि टॅक्सीचा वापर करणाऱ्यांच्या, दैनंदिन प्रवासाच्या खर्चात भर पडण्याची शक्यता आहे. सुधारित भाडेदर 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होतील.
हेही वाचा
