होतकरू क्रिकेटपटूंनाे, रणजी, अायपीएल खेळण्यासाठी पैसे मोजू नका, नाही तर गंडवले जाल!

रणजी, अायपीएलमध्ये खेळण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या होतकरू क्रिकेटपटूंनो या स्पर्धेत खेळण्यासाठी पैसे मागितले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता अाहे. या स्पर्धेमध्ये संधी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानं अटक केली अाहे.

होतकरू क्रिकेटपटूंनाे, रणजी, अायपीएल खेळण्यासाठी पैसे मोजू नका, नाही तर गंडवले जाल!
SHARES

रणजी करंडक स्पर्धा अाणि अायपीएलसारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक जण दिवस-रात्र घाम गाळून संधीच्या प्रयत्नात असतात. काही जण तर संधी मिळण्यासाठी पैसे मोजायलाही तयार होतात. अशा होतकरू क्रिकेटपटूंना अायपीएल, रणजी करंडक अाणि ईस्ट अाफ्रिका प्रीमिअर लीग स्पर्धेमध्ये संधी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानं पर्दाफाश केला अाहे. अटक केलेल्यांमध्ये विजय बऱ्हाटे (४३), जीवन मुकादम अाणि दिनेश मोरे (२६) यांचा समावेश अाहे.


तरुणांकडून लाखो रुपये उकळले

विजय बऱ्हाटे हा अारएनए स्पोर्टस क्लबचा संचालक असून सनरायझर्स हैदराबाद संघासाठी गुणवान खेळाडूंचा शोध घेण्याचं कंत्राट या कंपनीला मिळालं होतं. २०१३ मध्ये हा करार झाल्यानंतर अनेक तक्रारी येऊ लागल्या अाणि सनरायझर्स हैदराबादनं हा करार रद्द केला. तरीही कंपनीनं तरुणांना प्रलोभनं दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. तक्रारदारांकडून तब्बल ६३ लाख रुपये उकळल्याची माहिती अाहे.

कारकीर्द बरबाद करण्याची धमकी

कोणत्याही क्रिकेटपटूनं पोलिसांमध्ये तक्रार करण्याची धमकी दिली तर त्याची कारकीर्द बरबाद करण्याची धमकी विजय बऱ्हाटे अाणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्याचं समजतं. मात्र त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच मालमत्ता कक्षानं तिघांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात अालं. अारोपींना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात अाली अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा