Advertisement

अायपीएलचं उद्घाटन अाणि अंतिम सामनाही मुंबईत


अायपीएलचं उद्घाटन अाणि अंतिम सामनाही मुंबईत
SHARES

इंडियन प्रीमिअर लीगच्या ११व्या पर्वाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार अाहे. मुंबईकर क्रिकेटप्रेमींसाठी अानंदाची बातमी म्हणजे, अायपीएलचा सलामीचा सामना अाणि फायनलची लढतही मुंबईतच रंगणार अाहे. अायपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलनं सोमवारी अायपीएलच्या बाबतीत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. उद्घाटनाचा सोहळा ६ एप्रिलला मुंबईत रंगणार अाहे. त्यानंतर ७ एप्रिलला अायपीएलमधील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येईल. अंतिम सामना २७ मे रोजी मुंबईतच रंगणार अाहे.


सामने सात वाजता सुरू होणार

अातापर्यंत अायपीएलच्या सामन्यांना रात्री ८ वाजता सुरुवात व्हायची. पण प्रक्षेपणकर्त्या स्टार स्पोर्टसची मागणी गव्हर्निंग कौन्सिलनं मान्य केली असून अाठ वाजता सुरू होणारे सामने अाता ७ वाजता सुरू होतील. तसंच दुपारी ४ वाजता होणाऱ्या सामन्यांना ५.३० वाजता सुरुवात होईल.


प्रक्षेपणकर्त्या स्टार स्पोर्टसने वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. अाम्ही ती मान्य केली होती. अाठ वाजता सामन्याला सुरुवात झाल्यानंतर तो संपण्यासाठी बराच उशीर व्हायचा. एका दिवसात दोन सामने असतील तेव्हा स्टार स्पोर्टसच्या अनेक वाहिन्यांवरून ते दाखवले जातील.
- राजीव शुक्ला, अायपीएलचे अध्यक्ष


हेही वाचा - 

अायपीएलच्या लिलावात अजिंक्य रहाणेला २ कोटींची बेस प्राइज, ५७८ खेळाडूंवर लागणार बोली

अायपीएलमध्ये रोहित शर्मावर १५ कोटींची बोली


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा