Advertisement

अायपीएलमध्ये रोहित शर्मावर १५ कोटींची बोली


अायपीएलमध्ये रोहित शर्मावर १५ कोटींची बोली
SHARES

इंडियन प्रीमिअर लीगच्या (अायपीएल) ११व्या पर्वासाठीचा लिलाव २७ अाणि २८ जानेवारीला होणार असून त्याअाधी अाठही फ्रँचायझींनी अापल्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा गुरुवारी रात्री केली. गतवर्षीच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या अाणि जसप्रीत बुमरा या तीन खेळाडूंना अापल्या संघात कायम राखले अाहे. मुंबई इंडियन्सला तीन वेळा अायपीएलचे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मासाठी मात्र मालक अंबानींनी तब्बल १५ कोटी रुपये मोजले अाहेत. हार्दिकवर ११ कोटींची तर बुमरावर ७ कोटी रुपयांची बोली मुंबई इंडियन्सने लावली अाहे.


विराट कोहली ठरला महागडा खेळाडू

अायपीएलच्या लिलावाअाधीच भारताचा कर्णधार अाणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली सर्वात महागडा खेळाडू ठरला अाहे. त्याला कायम ठेवतानाच बंगळुरूने कोहलीला सर्वाधिक १७ कोटी रुपये मोजून विकत घेतले अाहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या तीन खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनीचाही समावेश होतो. त्याला चेन्नई सुपर किंग्सने १५ कोटी रुपयांना विकत घेतले अाहे. त्याखालोखाल स्टीव्ह स्मिथ (१२ कोटी, राजस्थान राॅयल्स), डेव्हिड वाॅर्नर (१२ कोटी, सनरायझर्स हैदराबाद), सुरेश रैना (११ कोटी, चेन्नई) अाणि एबी डीव्हिलियर्स (११ कोटी, बंगळुरू) यांचा क्रमांक लागतो.


रिटेन ठेवलेले खेळाडू

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, सर्फराझ खान
चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
दिल्ली डेअरडेव्हिल्स - रिषभ पंत, ख्रिस माॅरिस, श्रेयस अय्यर
कोलकाता नाईट रायडर्स - सुनील नरिन, अांद्रे रस्सेल
सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वाॅर्नर, भुवनेश्वर कुमार
राजस्थान राॅयल्स - स्टीव्ह स्मिथ
किंग्स इलेव्हन पंजाब - अक्षर पटेल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा