Advertisement

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं तिकीट ८०० रुपयांना

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ७ एप्रिल २०१८ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रंगणार अाहे. मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे तिकीट ८०० रुपयांपासून सुरू होत असून चाहत्यांना ८००० रुपयापर्यंतची तिकिटं www.mumbaiindians.com या अधिकृत संकेतस्थळावरून विकत घेता येतील.

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं तिकीट ८०० रुपयांना
SHARES

क्रिकेटशौकिनांसाठी मनोरंजनाची मेजवानी अाता काही दिवसांवर येऊन ठेपली अाहे. मुंबईकरांसाठी अानंदाची बातमी म्हणजे, अायपीएलच्या उद्घाटनाचा अाणि अंतिम सामनाही मुंबईत होणार अाहे. तीन वेळा अायपीएल करंडकाला गवसणी घालणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या सामन्यांच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाली अाहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ७ एप्रिल २०१८ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रंगणार अाहे. मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे तिकीट ८०० रुपयांपासून सुरू होत असून चाहत्यांना ८००० रुपयापर्यंतची तिकिटं www.mumbaiindians.com या अधिकृत संकेतस्थळावरून विकत घेता येतील.


२१ मार्चपासून तिकीटविक्री

फक्त १४ एप्रिल २०१८ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध होणारा सामना वगळता चाहत्यांना मुंबई इंडियन्सच्या सर्व सामन्यांची तिकीटं विकत घेता येतील. हा सामना रिलायन्स फाऊंडेशनच्या एज्युकेशन अाणि स्पोर्टस फाॅर अाॅल या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्यात अाला अाहे. २१ मार्चपासून तिकीटविक्रीला सुरुवात होणार असून अाॅनलाइनद्वारे विविध पर्यायांद्वारे ही तिकीटं विकत घेता येतील. जियोमनी ग्राहकांसाठी पहिले सात दिवस विशेष अशी विंडो ठेवण्यात अाली अाहे.


चाहत्यांसाठी विशेष तरतूदी

मुंबई इंडियन्सने चाहत्यांसाठी विशेष तरतूदी केल्या असून विजय मर्चंट ब्लाॅक एल लेव्हल-१ मध्ये दोन रांगा चाहत्यांसाठी राखीव ठेवण्यात अाल्या अाहेत. या रांगांमध्ये मुंबई इंडियन्सची विशेष पलटण थेट सामन्यांचा अानंद लुटेल. दिव्यांगांनाही सामन्याचा अानंद लुटता यावा, यासाठी या ठिकाणी व्हिलचेअरसह सामन्याचा अानंद लुटण्याची व्यवस्था असेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा