Advertisement

अाता अायपीएलमध्ये डीअारएसच्या अवलंब होणार


अाता अायपीएलमध्ये डीअारएसच्या अवलंब होणार
SHARES

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीअाय) गेली कित्येक वर्षे अनेकांचा विरोध पत्करून डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम अर्थात डीअारएसला (पंच पुनर्अाढावा पद्धत) विरोध केला होता. मात्र अाता बीसीसीअायचा विरोध मावळला असून इंडियन प्रीमिअर लीगच्या (अायपीएल) ११व्या पर्वात अाता रेफरल सिस्टिमचा अवलंब केला जाणार अाहे. त्यामुळे अाता ७ एप्रिलपासून मुंबईत रंगणाऱ्या उद्घाटनाच्या सामन्यापासून ते मुंबईतच रंगणाऱ्या अंतिम सामन्यापर्यंत अायपीएलमध्ये अाता डीअारएसचा वापर केला जाणार अाहे. बीसीसीअायतर्फे अायोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेत प्रथमच अधिकृतपणे डीअारएसचा वापर केला जाणार अाहे.


विराट कोहलीचाही डीअारएसला अाक्षेप नाही

डीअारएस तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीला कोणताही अाक्षेप नाही. यापूर्वी २०१६ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात डीअारएसचा वापर करण्यात अाला होता. ‘डीअारएस तंत्रज्ञान वापरण्याबाबत बीसीसीअाय गेल्या काही महिन्यांपासून अाग्रही होते. पण या वर्षी पहिल्यांदाच अायपीएलमध्ये ही पद्धत अवलंबण्यात येत अाहे. बीसीसीअायने अन्य सर्व तंत्रज्ञानाचा अवलंब केला अाहे, मग डीअारएस का नको? दीड वर्षांपूर्वी भारताच्या परदेशातील सामन्यात डीअारएस पद्धत वापरण्यात अाली होती. अाता ती अायपीएलमध्ये वापरण्यात येईल’


पंचांसाठी घेतली कार्यशाळा

दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर महिन्यात बीसीसीअायने डीअारएसचे नियम समजून घेण्यासाठी डोमेस्टिक अंपायर्ससाठी कार्यशाळा अायोजित केली होती. या सत्रात सहभागी झालेल्या १२ भारतीय पंचांना अायसीसीच्या अंपायर्सचे प्रशिक्षक डेनिस बम्स अाणि अाॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू तथा पंच पाॅल राफेल यांनी मार्गदर्शन केले होते. ‘भारतीय क्रिकेटमध्ये अातापर्यंत डीअारएस सिस्टिमचा अवलंब करण्यात अाला नाही. जर अायपीएलमध्ये स्थानिक पंचांची नियुक्ती केली जाते, तर त्यांना या सिस्टिमविषयी सविस्तर माहिती असणे अावश्यक अाहे. त्यामुळेच अाता ही कार्यशाळा अायोजित करण्यात अाली होती,’ असे या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या एका पंचाने सांगितले.


हेही वाचा -

अायपीएलचं उद्घाटन अाणि अंतिम सामनाही मुंबईत

अायपीएलमुळे बीसीसीअायची झाली 'इतकी' कमाई

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा