टी-२० लीगमध्ये वाढता भ्रष्टाचार? 'आयसीसी' करणार कडक नियमावली

सध्या जगभरात सुरु असलेल्या टी-२० आणि टी-१० लीगमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढण्याची शक्यता गृहीत धरून इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (आयसीसी)ने या लीगसाठी कडक नियमावली करण्याचा विचार सुरू केला आहे. 'आयसीसी'च्या १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

टी-१० लीगची भर

भारतातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झालयानंतर आयसीसीच्या सदस्य देशांनीही त्यांच्या टी-२० लीग सुरू केल्या आहेत. त्यातच आता टी-१० लीगचीही भर पडली आहे. या लीगमध्ये भ्रष्टाचार वाढीस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खेळाडूंची परवानगी

'आयसीसी'च्या बैठकीमध्ये या लीगची नियमावली आणि त्यांच्या मान्यतेविषयी चर्चा केली जाणार आहे. तसंच, लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना देण्यात येणारी परवानगी या विषयावरही चर्चा केली जाणार आहे.

आर्थिक स्त्रोत तपासणार

या लीगसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रं, करार, लीगचे मालक आणि या लीगचा आर्थिक स्रोत या सगळ्यांचा विचार करून या लीगसाठी मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळं भविष्यात टी-२० लीगमुळे वाढणारा भ्रष्टाचार कमी होणार का? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा-

'हा' आहे टीम इंडियाचा नवा 'टीममेट'!, नक्की बघा...

वेस्ट इंडिज सीरिज: चौथी 'वन डे' वानखेडेऐवजी ब्रेबाॅर्नवर!


पुढील बातमी
इतर बातम्या