ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने दिला विजयाचा तीळगूळ

अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय क्रिकेट समान्यात भारतानं आॅस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेलं २९९ धावांचं लक्ष्य भारतानं ६ गडी राखून पार करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या २९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारतीय संघाच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. दोघांनी ४७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर धवन (३२) बाद झाला. धवननंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात विराटनं एकदिवसीय क्रिकेटमधील ३९ वं शतक झळकावलं. त्याने ११२ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकार मारत १०४ धावा केल्या. मात्र, शतक झाल्यावर मोठा फटका मारण्याच्या नादात विराट बाद झाला. त्यानंतर मधल्या फळीत आलेल्या महेंद्रसिंग धोनीनं ५४ चेंडूंत २ षटकार मारत नाबाद ५५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.


हेही वाचा -

हार्दिक आणि राहुल याच्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांनीही केली टीका

सायबर चोरट्यांनी घातला इटालियन कंपनीला १३० कोटींचा गंडा


पुढील बातमी
इतर बातम्या