Advertisement

हार्दिक आणि राहुल याच्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांनीही केली टीका

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत असून आता मुंबई पोलिसांनीही महिलांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट टाकत निषेध नोंदवला आहे.

हार्दिक आणि राहुल याच्या वक्तव्यावर मुंबई पोलिसांनीही केली टीका
SHARES

दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या दोघांनी केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत असून आता मुंबई पोलिसांनीही महिलांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट टाकत निषेध नोंदवला आहे.


खेळाडूंचे लक्षण काय?

मुंबई पोलिसानी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी 'खरा सज्जन माणूस हा सर्वत्र सज्जनच असतो', असे लिहीलं असून एक फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये महान खेळाडूंचे लक्षण काय? यावर त्यांनी मैदानात धावा काढा पण मैदानाबाहेर असताना महिलांचा आदर करा अशा शब्दात पोलिसांनी हार्दिक आणि राहुलवर टीका केली आहे.

आक्षेपार्ह विधान

'कॉफि विथ करण' या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयनं या दोघांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली होती. यावर हार्दिकनं दिलेलं स्पष्टीकरण पटलेलं नसून या दोन्ही खेळाडूंवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव विनोद राय यांनी मांडला होता. दरम्यान या प्रकरणी सोमवारी दोघांनीही बिनशर्त माफी मागितली आहे. परंतू, माफी त्यांनी मागितली असली, तरी त्यांचं वर्तन योग्य नसल्याचं मत बीसीसीआयच्या १० सदस्य संघटनांनी व्यक्त केलं आहे.



हेही वाचा -

बेस्ट संपाचा आठवा दिवस, आज तोडगा निघण्याची शक्यता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा