Advertisement

बेस्ट संपाचा आठवा दिवस, आज तोडगा निघण्याची शक्यता

बेस्ट कंर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप आठव्या दिवशीही कायम आहे. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा होती. पण उच्च न्यायालयात देखील संपावर कुठलाच तोडगा निघू शकला नाही. मंगळवारी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे.

बेस्ट संपाचा आठवा दिवस, आज तोडगा निघण्याची शक्यता
SHARES

बेस्ट कंर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप आठव्या दिवशीही कायम आहे. उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा होती. पण उच्च न्यायालयात देखील संपावर कुठलाच तोडगा निघू शकला नाही.  मंगळवारी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आम्हाला आदेश द्यावे लागतील असं उच्च न्यायालयानं सोमवारच्या सुनावणीतच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत संपावर तोडगा निघतो का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.  


संपावर उच्च न्यायालयाची नाराजी

बेस्ट संपावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं बेस्टच्या संपावर नाराजी व्यक्त केली. 'सर्वसामान्यांना वेठीस धरू नका, अशा शब्दांत न्यायालयानं कर्मचाऱ्यांना फटकारलं. 'तुम्हाला नेमक काय हवं आहे. तुम्हाला चर्चाही करायची नाही आणि संपही मागे घ्यायचा नाही, अशी विचारणा न्यायालयानं केली. तसंच शुक्रवारी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हाल अशी अपेक्षा होती, असंही सुनावणीवेळी न्यायालयानं म्हटलं


आजच्या बैठकीत तोडगा निघणार?

उच्च न्यायालयानं मंगळवारी पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक घेण्याची सुचना दिली. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेशही दिले.  तसंच जर या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आम्हाला आदेश द्यावा लागेल, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे


प्रवाशांचे अतोनात हाल

गेला आठवडाभर संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण सर्व निष्फळ ठरल्या. पण या सर्वात प्रवासी मात्र भरडला जात आहे. संपामुळे लाखो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांचे हाल पाहता अॅड. दत्ता माने यांनी गेल्या आठवड्यात याप्रकरणी याचिका केली होती. हा संप बेकायदा ठरवून तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली होती.हेही वाचा - 

संपाची संक्रांत कायम, मंगळवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा