भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून तुषार अारोठे पायउतार

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार अारोठे यांनी अापल्या पदाचा राजीनामा दिला अाहे. त्यांची खडतर ट्रेनिंग पद्धत संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना पटत नसल्यामुळे अारोठे अाणि या खेळाडूंमध्ये नेहमी खटके उडायचे. अखेर तुषार अारोठे यांनी राजीनामा देणे पसंत केले. 

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक तुषार अारोठे यांचा राजीनामा बीसीसीअायने स्वीकारला अाहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी हा राजीनामा दिला असून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी बीसीसीअायचे अाभार मानले अाहेत.

- बीसीसीअाय

प्रशिक्षण पद्धतीविषयी अाक्षेप

महिला खेळाडूंनी अारोठेंच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली होती. बीसीसीअायच्या प्रशासकीय समितीबरोबर झालेल्या बैठकीत महिला खेळाडूंनी ही मागणी केली होती. अारोठे यांच्या प्रशिक्षण पद्धतीविषयी खेळाडू, निवड समिती सदस्य अाणि संघ व्यवस्थापकांनाही अाक्षेप होते, असं बीसीसीअायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.


हेही वाचा -

शार्दूल ठाकूरला लाॅटरी, इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे संघात निवड

राहुल द्रविडचा 'हाॅल अाॅफ फेम’मध्ये समावेश


पुढील बातमी
इतर बातम्या