• शार्दूल ठाकूरला लाॅटरी, इंग्लंड दौऱ्यासाठी वनडे संघात निवड
SHARE

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला लाॅटरी लागली असून जायबंदी झालेल्या जसप्रीत बुमराच्या जागी अाता शार्दूलला इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या वनडे संघात संधी मिळाली अाहे. गेल्या महिन्यात अायर्लंडविरुद्धच्या सामन्यात बुमराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. बुधवारी त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात अाली असून तो अाता दुखापतीतून बरा होण्यासाठी मायदेशी परतला अाहे. शार्दूल लवकरत लंडनला रवाना होणार अाहे.


परदेशातील अनुभव फायद्याचा

शार्दूल ठाकूरने सात टी-२० अाणि तीन वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलं अाहे. हे सर्व सामने तो परदेशात खेळल्यामुळे तेथील वेगवान खेळपट्ट्यांचा फायदा त्याला इंग्लंड दौऱ्यात होणार अाहे. दक्षिण अाफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या वनडेत त्याने चार विकेट्स मिळवल्या होत्या. तसेच अायपीएलमध्येही त्याने १६ विकेट्स मिळवल्या होत्या. या उंचावलेल्या अात्मविश्वासाचा त्याला फायदा होणार अाहे.


असा असेल भारताचा संघ

भारताचा पहिला एकदिवसीय सामना १२ जुलै रोजी नाॅटिंगहॅमला असून दुसरी वनडे १४ जुलै रोजी लंडनला तर तिसरी वनडे १७ जुलै रोजी लीड्सला होणार अाहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वनडे संघात शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव यांचा समावेश अाहे.


हेही वाचा -

टीम इंडियाचा बॉलर शार्दुलच्या आई-वडिलांचा अपघात

अर्जुन तेंडुलकरचा टीम इंडियासोबत लंडनमध्ये सरावसंबंधित विषय
ताज्या बातम्या