‘काॅफी विथ करण’ प्रकरणावर हार्दिक पंड्याने साेडलं मौन, म्हणाला…

‘काॅफी विथ करण’ या टिव्ही शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना प्रचंड टीकेला सामाेरं जावं लागलं होतं. शिवाय बीसीसीआयने या दोघांवर कारवाई देखील केली होती. त्यावर हार्दिकने पहिल्यांदाच मौन साेडलं आहे.

या शोचा होस्ट करण जोहरने विचारलेल्या एका प्रश्नावर दोघांनीही महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. हा भाग प्रसारीत झाल्यावर दोघांवरही प्रचंड टीका झाली. सोशल मीडियावरून दोघांना ट्रोल करण्यात आलं. हा भाग प्रसारित झाला तेव्हा भारताचाा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. बीसीसीआयने या दौऱ्यातून दोघांना माघारी बोलवलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या पीएस नरसिंहा यांनी चौकशी करून दोघांवरील निलंबन मागे घेण्यात आलं. 

हेही वाचा- आम्ही संधी दिली म्हणून विराट कोहली यशस्वी- कृष्णम्माचारी श्रीकांत

बीसीसीआयच्या लोकपाल समितीने हार्दिक आणि राहुल यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा दंड केला होता. लोकपालच्या आदेशानुसार दोन्ही खेळाडूंनी पॅरा मिलिटरी फोर्सच्या १० शहिद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख तर तितकीच रक्कम अंधांच्या क्रिकेटसाठी देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं. या वादामुळे दोघांचीही प्रचंड बदनामी झाली.

त्यावर पहिल्यांदाच मौन सोडताना हार्दिक म्हणाला, आम्ही क्रिकेटपटू आहोत. असा प्रकार नॅशनल टिव्हीवर घडल्यास त्याचे काय परिणाम होतात, हे आम्हाला ठाऊक नव्हतं. मी तेव्हा जे बोलून गेलो, ते शब्द मला मागे घेता आले नसते. त्यामुळे माझ्या हातात काहीच उरलं नव्हतं. टेनिसच्याच भाषेत सांगायचं तर चेंडू माझ्या कोर्टमध्ये नव्हता. त्यामुळे या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार मला नव्हता. अशा वेळी आपण अधिकच कात्रीत सापडतो.

सर्बियन माॅडेल नताशा स्टॅन्कोविकसोबत केलेल्या साखरपुड्यामुळे सध्या हार्दिक चर्चेत आला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या