Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

आम्ही संधी दिली म्हणून विराट कोहली यशस्वी- कृष्णम्माचारी श्रीकांत

विराटच्या खेळीचं जगभरात कौतूक केलं जात असलं तरी त्यामागचं श्रेय भारतीय संघाचे माजी निवड समिती प्रमुख कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी घेतलं.

आम्ही संधी दिली म्हणून विराट कोहली यशस्वी- कृष्णम्माचारी श्रीकांत
SHARES

भारतीय संघाचा कर्णधार व क्रिकेटविश्वातत रनमशील अशी ओळख असलेल्या विराट कोहलीनं आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. भारतीय संघात संधी मिळाल्यापासून विराटनं तुफानी फलंदाजी केली. तसंच, २०१९ हे वर्ष विराट कोहलीसाठी सर्वोत्तम ठरलं आहे. आयसीसीच्या क्रमवारीत आपलं स्थान पक्क ठेवत भारतीय संघाला अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये आणि मालिकांमध्ये विजय मिळवून दिला आहे.

जगभरात कौतूक

२०१९ वर्षाअखेरीस विराटनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वन-डे, टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. विराटच्या या खेळीचं जगभरात कौतूक केलं जात असलं तरी त्यामागचं श्रेय भारतीय संघाचे माजी निवड समिती प्रमुख कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी घेतलं आहे.

सर्वोत्तम संघ

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे. '२००८ साली मी निवड समितीचा प्रमुख म्हणून काम करायला सुरुवात केली. २०११ विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघ बांधणं हे माझं त्यावेळचं ध्येय होतं. महेंद्रसिंह धोनीसारखा कर्णधार संघात होता, सर्व गोष्टी जुळून आल्या आणि आम्ही घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकलो. खेळाडू आणि निवड समिती प्रमुख म्हणून विश्वचषक विजयात आपला सहभाग असणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मला हे देखील सांगायला आवडेल, की माझ्या समितीनं विराट कोहलीला त्या काळात अधिक खुलून खेळण्याची संधी दिली, आज तो कशी कामगिरी करतोय हे आपण सर्व पाहतच आहोत', असं त्यांनी म्हटलं.हेही वाचा -

किल्ल्यावर नशा; शिवभक्तांनी कपडे काढून दिला चोप

बेस्ट खरेदी करणार ५० दुमजली बसRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा