Advertisement

बेस्ट खरेदी करणार ५० दुमजली बस

मुंबईकरांना लवकरच उंचावरून धावती मुंबई पाहायला मिळणार आहे.

बेस्ट खरेदी करणार ५० दुमजली बस
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांना लवकरच उंचावरून धावती मुंबई पाहायला मिळणार आहे. मुंबईची खास ओळख असलेली बेस्टची दुमजली बस पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. बेस्ट उपक्रमाला नव्या दुमजली बस खरेदी करण्याला अधिकृत परवानगी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. बेस्टनं १४ वर्ष पूर्ण झालेल्या १२० बस पैकी ७० बस भंगारात काढण्यास सुरूवात केली आहे.

धावती मुंबई

मुंबईत १९३७ साली पहिली दुमजली बस धावली. त्यावेळी उंचावरून धावती मुंबई कशी दिसते त्याचा नजारा दाखवणारी दुमजली बस म्हणजे खरेतर मुंबईची ओळख होती. मुंबईबाहेरून आलेल्या प्रत्येकालाच या दुमजली बसचं आकर्षण होतं. या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावरील पहिली जागा पकडण्यासाठी प्रवाशांमध्ये मोठी स्पर्धा व्हायची. पूर्वी मुंबईत सर्रास दिसणारी दुमजली बस आता काही ठरावीक मार्गावरच धावत आहे.

इतिहासजमा होण्याची चिन्हं

काही दिवसांपूर्वी दुमजली बस इतिहासजमा होण्याची चिन्हं दिसत होती. मात्र, या बस मुंबईच्या रस्त्यावरून नाहिशा होऊ नये यासाठी काही प्रवाशांनी बेस्टच्या हेल्पलाईनवर कॉल करण्यास सुरूवात केली. तसंच, त्यांनी या बस बंद होऊ नये याची बेस्ट प्रशासनाकडं मागणी केली आहेत.

१४० प्रवासी क्षमता

बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, १४० प्रवासी क्षमता असलेली ही बस रेल्वे स्थानकांपासून व्यावसायिक परिसरात चालविण्यात येत आहे. बेस्ट टप्प्याटप्पयानं ५० दुमजली बस खरेदी करणार आहेत. या बसच्या चेसी अशोक लिलॅंड कंपनीनं बनवल्या आहेत. तसंच, बसची बॉडी अॅथनी गॅरेजद्वारा बनविण्यात आल्या आहेत. या बसमध्ये चडण्यास आणि उतरण्यास केवळ एकच दरवाजा आहे.



हेही वाचा -

पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार

अजितदादांना मिळाला पसंतीचा 'हा' बंगला, मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा