Advertisement

अजितदादांना मिळाला पसंतीचा 'हा' बंगला, मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप

सरकारने गुरूवारी परिपत्रक काढून ३६ कॅबिनेट अन् राज्यमंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं.

अजितदादांना मिळाला पसंतीचा 'हा' बंगला, मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप
SHARES

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर गुरूवारी मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पसंतीचा बंगला देण्यात आला आहे. अजितदादांचा मुक्काम आता मलबार हिल येथील देवगिरी बंगल्यात असेल. तर आदित्य ठाकरे यांना मंत्रालयासमोरील अ-६ हा बंगला देण्यात आला आहे. 

सरकारने गुरूवारी परिपत्रक काढून  ३६ कॅबिनेट अन् राज्यमंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा, राजेश टोपे यांना जेतवन बंगला देण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचाही बंगला बदलण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी अ ९ हा बंगला देण्यात आला होता. मात्र त्यांना आता अवंती ८ हा बंगला देण्यात आला आहे. बंगल्या बदलल्यामुळे दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने सुडाच्या भावनेने बंगला बदलून माझ्यावर अन्याय केला, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

 मंत्र्यांना मिळाले हे बंगले

  • नवाब मलिक - अ ५ 
  • हसन मुश्रीफ - ब ५ 
  • वर्षा गायकवाड - ब ४
  • जितेंद्र आव्हाड - ब १
  • सुनील केदार - ब ७
  • विजय वडेट्टीवार - अ ३
  • अमित देशमुख - अ ४ 
  • उदय सामंत - ब २
  • दादाजी भुसे - ब ३
  • संजय राठोड - क १ 
  • गुलाबराव पाटील - क ८ 
  • के. सी पाडवी - क ३
  • संदीपान भुमरे - क ४
  • बाळासाहेब पाटील - क ६
  • अनिल परब - क ५
  • अस्लम शेख - क २
  • यशोमती ठाकूर - ब ६
  • शंकरराव गडाख - सुरुची १६
  • धनंजय मुंडे - अ ९ 
  • आदित्य ठाकरे - अ ६ 
  • अब्दुल सत्तार - सुरुची १५ 
  • सतेज पाटील - सुरुची ३ 
  • शंभुराज देसाई - यशोधन १२ 
  • बच्चू कडू - रॉकीहील टॉवर १२०२
  • दत्तात्रय भरणे - अवंती १ 
  • विश्वजीत कदम - निलांबरी ३०२
  • राजेंद्र यड्रावकर पाटील - सुरुची २ 
  • संजय बनसोडे - रॉकीहील टॉवर १२०३
  • प्राजक्त तनपुरे - निलांबरी ४०२
  • आदिती तटकरे - सुनिती १० 



हेही वाचा -

फडणवीस, महाजन यांनीच तिकीट कापलं, खडसेंनी पहिल्यांदाच केला थेट आरोप

राज्यसभेत सेक्सवर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं निधन




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा