Advertisement

राज्यसभेत सेक्सवर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे जवळचे मानले जाणारे राज्यसभेचे माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचं गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झालं. राज्यसभेतील सेक्स या विषयावरील त्यांचं भाषण चांगलंच गाजलं होतं.

राज्यसभेत सेक्सवर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं निधन
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे जवळचे मानले जाणारे राज्यसभेचे माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचं गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झालं. राज्यसभेतील सेक्स या विषयावरील त्यांचं भाषण चांगलंच गाजलं होतं.

डी. पी. त्रिपाठी मूळ उत्तर प्रदेशातील सुलतानपूरधील होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या त्रिपाठी यांनी सोनिया गांधी यांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. अभ्यासू खासदार अशीही त्यांची ओळख होती.

हेही वाचा- पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार

गेल्या वर्षीच त्रिपाठी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पूर्ण झाला होता. यावेळी त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सेक्सचा मुद्दा उपस्थित करून सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घातलं होतं. हे त्यांचं भाषण सोशल मीडियावर चांगलंच गाजलं होतं. 

आपल्या भाषणात त्रिपाठी म्हणाले होते की, भारतात 'कामसूत्र' सारखं पुस्तक लिहिण्यात आलं आहे. हे पुस्तक लिहिणाऱ्या वात्स्यायन यांना ऋषींचा दर्जा देण्यात आला होता. अजंता-एलोरा आणि खजुराहोसारखी अनेक स्मारके याच विषयाला समर्पित असूनही भारतात सेक्स या विषयाकडे गंभीरपणे पाहिलं जात नाही. सेक्सशी संबंधित आजारांमुळे भारतात दरवर्षी हजारो मृत्यू होतात. तरीही  आपल्या देशातील संसदेत सेक्सवर मनमोकळी चर्चा झाली नाही,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.  

हेही वाचा- फडणवीस, महाजन यांनीच तिकीट कापलं, खडसेंनी पहिल्यांदाच केला थेट आरोप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा