Advertisement

पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार


पुढच्या २ वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण करणार- अजित पवार
SHARES

दादरच्या इंदू मिलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम चालू महिन्यात सुरू होणार आहे. त्यासाठी राज्याच्या पातळीवरील सर्व आवश्यक परवानग्या मंत्रिमंडळाकडून महिन्याभरात देण्यात येतील. १४ एप्रिल २०२२ पर्यंत म्हणजेच पुढील २ वर्षांत डाॅ. आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार आणि नवाब मलिक यांनी गुरूवारी सकाळी चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर इंदू मिल इथं जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्मारकाच्या कामासंदर्भात माहिती दिली.

हेही वाचा- फडणवीस, महाजन यांनीच तिकीट कापलं, खडसेंनी पहिल्यांदाच केला थेट आरोप

यावेळी पवार म्हणाले, २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाॅ. आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत या कामाने म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. इंदू मिल स्मारकाच्या कामाबाबत ज्या काही परवानग्या रखडल्या आहेत, त्या परवानग्यांचा केंद्राशी संबधित नसून राज्य स्तरावरील सर्व परवानग्या आहेत. त्यामुळे महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सर्व परवानग्या देऊन स्मारकाच्या कामाचा रस्ता मोकळा करून देण्यात येईल. 

मागच्या सरकारने स्मारकाबाबतच्या काही निर्णयांना मान्यता दिली नव्हती. मागच्या सरकारचं आॅडिट करायला मी इथं आलेलो नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून या स्मारकासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा पुरवण्यात येईल, त्यानुसार १४ एप्रिलपर्यंत २०२२ पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा- गुरूवारी खातेवाटप होणार जाहीर: अजित पवार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा