Advertisement

गुरूवारी खातेवाटप होणार जाहीर: अजित पवार

नव्या मंत्र्यांना गुरूवारी संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार असल्याचं नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

गुरूवारी खातेवाटप होणार जाहीर: अजित पवार
SHARES

राज्यातील महाविकास आघाडीच्या एकूण ३६ आमदारांनी सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांना गुरूवारी संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार असल्याचं नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बुधवारी मंत्रालयात झालेल्या ४ तासांच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्यांबाबत चर्चा करण्यात आल्याचं समजतं. ३ पक्षांचे सरकार असल्यामुळं पुढील वाटचालीत अडचणी येऊ नयेत या अनुषंगानं ही चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

प्रमुख नेत्यांची बैठक

मंत्रालयात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ही बैठक ४ तास चालली होती. शपथविधी झाला तरी नवनिर्वाचीच मंत्र्यांना खातेवाटप झाला नसल्यानं खातेवाटपाबाबत अजूनही महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, या चर्चा निरर्थक असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

पालक मंत्र्यांबाबतही चर्चा

या बैठकीत पालक मंत्र्यांबाबतही चर्चा झाली आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर करण्यास काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे मंत्री आणि त्यांचे खाते व पालक मंत्री यांची घोषणा होणार असल्याचं पवार यांनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या वाटेला आलेल्या मंत्रीपदे व मंत्र्यांची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा