किल्ल्यावर नशा; शिवभक्तांनी कपडे काढून दिला चोप

काही तरुणांनी किल्ल्यावर थर्टीफर्स्ट पार्टी साजरी केली. याबाबत महिती मिळताच त्या तरुणांना शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला आहे.

SHARE

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर मद्यपान करणं बंधनकारक आहे. याबाबत अनेकदा शिवप्रेमींकडून जनजागृती करण्यात आली आहे. तसंच, काही मद्यपान करणाऱ्यांना चांगला चोपही दिला आहे. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना थांबत नाही आहेत. नुकताच देशभरात सर्वत्र थर्टी फर्स्ट पार्टी साजरी करण्यात आली. यावेळी काही तरुणांनी किल्ल्यावर थर्टीफर्स्ट पार्टी साजरी केली. याबाबत महिती मिळताच त्या तरुणांना शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला आहे.

थर्टी फर्स्ट पार्टी

काही तरूण मूलं ३१ डिसेंबरच्या थर्टी फर्स्ट पार्टीसाठी माथेरानमधील पेब किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी त्या मुलांनी दारु आणि गांजांचं सेवेन केलं. याबाबत तेथील स्थानिकांना आणि शिवप्रेमींना माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्या तरुणांची चौकशी केली असता ही मूलं मुंबईचे रहिवाशी असल्याचं त्यांनी सांगितलं.

तरुणांना चोप

अक्षय भोसले, किरण नागडा, राहुल नाहीर, ऋषी शहा, मानस अग्रवाल, मिलिंद राठोड, वैभव बोहरी, दीप ताऱ्या, संजय चांदवाणी, इशांत ठक्कर, ऋषभ शेठ अशी या नशा करणाऱ्या तरुणांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. नशेत असणाऱ्या या तरुणांना पकडून शिवभक्तांनी चोप दिला. तसंच, त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना माफी मागायला लावली.हेही वाचा -

मुंबईतील 'ही' अतिधोकादायक पूल नव्यानं बांधणार

गुरूवारी खातेवाटप होणार जाहीर: अजित पवारसंबंधित विषय
ताज्या बातम्या