Advertisement

मुंबईतील 'ही' अतिधोकादायक पूल नव्यानं बांधणार

मुंबईतील घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि पवई येथील ४ पादचारी पूल पाडण्यात येणार असून त्याठिकाणी नव्यानं पूल बांधण्यात येणार आहेत.

मुंबईतील 'ही' अतिधोकादायक पूल नव्यानं बांधणार
SHARES

अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून २ जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल १४ मार्च २०१९ रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा बळी गेला होता. या घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. त्यानुसार, मुंबईतील घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी आणि पवई येथील ४ पादचारी पूल स्ट्रक्चरल ऑडिटवेळी धोकादायक ठरविण्यात आली होती. ही अतिधोकादायक पूल आता पाडण्यात येणार असून त्याठिकाणी नव्यानं पूल बांधण्यात येणार आहेत.

नवे पूल

विक्रोळी पूर्व टागोरनगर आणि पवईतील साकी विहार रोड इथं महापालिका नवे पूल बांधणार आहे. या कामासाठी पालिका ७ कोटी ७९ लाखांचा खर्च करणार आहे. महापालिकेमार्फत मुंबई व पूर्व-पश्चिम उपनगरातील पुलांची आवश्यक दुरुस्ती तर काही ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहेत.

४ पूल अतिधोकादायक

स्ट्रक्चरल ऑडिटर मे. स्ट्रक्टवेल डिझायनर्स अ‍ॅण्ड कन्सलटंटस् प्रा. लि.नं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये संबंधित ४ पूल अतिधोकादायक आढळले होते. तर टागोरनगर विक्रोळी येथे नागरिकांच्या मागणीनुसार तर साकी विहार रोड पवई इथं पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होत असल्यामुळं २ नवीन पूल बांधण्यात येणार आहेत.

पूल व लांबी

  • घाटकोपर पश्चिम बर्वेनगर : १२ मीटर
  • विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर : २० मीटर
  • पवई रेनेसन्स हॉटेलजवळ २९ मीटर
  • मुलुंड रमाबाई नगर ३० मीटर
  • विक्रोळी पूर्व टागोरनगर २० मीटर

हेही वाचा -

एमएमआरडीएकडून मेट्रोसाठी ७६ हजार २९९ कोटींची तरतूद

मुंबईत कमाल तापमानाचा पारा घसरला, गारठा वाढला



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा