एमएमआरडीएकडून मेट्रोसाठी ७६ हजार २९९ कोटींची तरतूद

नववर्षात मेट्रो प्रकल्पांची कामं जलद गतीनं होणार आहेत.

SHARE

नववर्षात मेट्रो प्रकल्पांची कामं जलद गतीनं होणार आहेत. कारण मुंबई व परिसरातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएनं ७६ हजार २९९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तरतूद केलेला हा निधी २०२१पर्यंत पुरणार आहे. तसंच, या निधीतून दहिसर ते डीएननगर मेट्रो-२ अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ या २ मार्गांची कामं पूर्ण करण्यात येणार आहेत. तसंच, आगामी २ वर्षांत डीएननगर ते मंडाळा मेट्रो-२ ब, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ या मार्गाची कामं पूर्ण होणार आहेत.

९८ स्थानकं

या दोन्ही मार्गांवर मिळून एकूण ९८ स्थानकं असणार आहेत. या स्थानकांवरून ५० लाख प्रवासी प्रवास करतील. ही मेट्रो सुरू झाल्यास या उपनगरीय रेल्वेचे ३५ टक्के प्रवासी या मार्गांकडे वळणार असल्याचा अंदाज एमएमआरडीएनं वर्तवला आहे.

काही निधी खर्च

या प्रकल्पांवर ४४ हजार ८६९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रकल्पासाठी २०१९ वर्षात काही निधी खर्च झाला आहे. उर्वरित खर्च पुढील २ वर्षात होणार आहे. मेट्रो मार्ग पूर्ण करण्यासाठी ५५० हून अधिक इंजिनीअर्स, ८५०० कुशल, तर ९५०० अकुशल कामगार काम करत आहेत. या प्रकल्पांमुळं स्टिल, सिमेंट, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्राला मोठा फायदा झाल्याची माहिती मिळते.

मेट्रो प्रकल्प

  • मेट्रो-२ अ - लांबी १८.६ कि.मी. खर्च ६४१० कोटी
  • मेट्रो २ ब - लांबी २३.६ कि.मी. खर्च १० हजार ९८६ कोटी
  • मेट्रो ४ - लांबी ३२.३ कि.मी. खर्च १४ हजार ५४१ कोटी
  • मेट्रो ६ - लांबी १४.५ कि.मी. खर्च ६७१६ कोटी
  • मेट्रो ७ - लांबी १६.५ कि.मी. खर्च ६२०८ कोटी

मेट्रो कारडेपोचा निर्णय

येत्या १५ दिवसांत मेट्रो कारडेपोचा निर्णय घेण्यात येणार आहे. कारडेपो कोणत्या जागी बांधायचा यासाठी सरकारनं समिती नेमली आहे. या समितीला १५ दिवसांची मूदतवाढ मिळाली असून, येत्या काही दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर मेट्रो-३च्या कामाला आणखी गती मिळणार आहे.हेही वाचा -

ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी प्रवास महाग

पश्चिम रेल्वेकडून 'या' लोकलच्या चाचणीवर शिक्कामोर्तबसंबंधित विषय
ताज्या बातम्या