Advertisement

ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी प्रवास महाग

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी प्रवास महाग
SHARES

पश्चिम रेल्वेनंतर आता एसी लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. ही एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. त्यामुळं प्रवाशांना कधी ही लोकल सुरू होणार याची उत्सुकता आहे. परंतु, या लोकलचं तिकीट भाडं किती असणार याची माहिती प्रवाशांना मिळाली नसल्यानं गारेगार प्रवासासाठी कती पैसे मोजावे लागणार याचा विचार सध्या प्रवासी करत आहेत. मात्र, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर एसी लोकलमधून प्रवास केल्यास १८५ रुपये भाडे मोजावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाडेदरावर चर्चा

पहिल्या एसी लोकलचा मार्ग निश्चित झाल्यानंतर त्याच्या भाडेदरावर चर्चा अद्याप सुरू आहे. मंगळवारी या संदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून, ही लोकल जानेवारीअखेरीस धावणार असल्याची माहिती मिळते. मध्य रेल्वेवर सुरुवातीला एकूण ६ एसी लोकल चालवल्या जाणार आहेत. यातील पहिली लोकल नुकतीच दाखल झाली आहे. तसंच, त्याच्या चाचण्याही सुरू आहेत.

खिशाला कात्री

लोकलचा वेग, स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा, सुरक्षेसंदर्भातील यंत्रणा इत्यादींचा चाचणीत समावेश आहे. पहिली लोकल ठाणे ते वाशी, पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहे. या लोकलचं भाडे किती असेल याविषयी प्रवाशांमध्ये उत्सुकताही आहे. परंतु, एसी लोकलचे भाडे प्रवाशांच्या खिशाला कात्री देणारे असेल हे निश्चित अाहे.

लोकलचं तिकीट

सध्या मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या तिकीट भाडेदरावर चर्चा सुरू असून, ठाणे ते पनवेलपर्यंतचे तिकीट दर १८५ रुपये असेल, तर एका महिन्याचा पास १ हजार ९८५ रुपये असल्याची माहिती मिळते. सध्या या मार्गावरील सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचं तिकीट १४५ रुपये आणि महिन्याचा पास ९६५ रुपये आहे. ठाणे ते ऐरोलीपर्यंतचे सध्या प्रथम श्रेणीचे तिकीट ५५ रुपये आणि महिन्याचा पास ४७५ रुपये असून, एसी लोकलचे भाडेदर अनुक्रमे ७० रुपये आणि ७५५ रुपये पास करण्यावर विचार सुरू असल्याचं समजतं.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेकडून 'या' लोकलच्या चाचणीवर शिक्कामोर्तब

New Year: नववर्षाच्या रात्री 'इतक्या' मद्यपी चालकांवर कारवाई



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा