Advertisement

पश्चिम रेल्वेकडून 'या' लोकलच्या चाचणीवर शिक्कामोर्तब

अर्धवातानुकूलित लोकलची चाचणी घेण्यावर पश्चिम रेल्वेनं शिक्कामोर्तब केलं आहे.

पश्चिम रेल्वेकडून 'या' लोकलच्या चाचणीवर शिक्कामोर्तब
SHARES

अर्धवातानुकूलित लोकलची चाचणी घेण्यावर पश्चिम रेल्वेनं शिक्कामोर्तब केलं आहे. ६ डब्ब्यांच्या अर्ध वातानुकूलित लोकलची चाचणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्ध वातानुकूलित लोकल चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे.

१२ फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावरील सामान्य लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करुन एसी लोकल चालवण्यात येत आहे. त्यामुळं प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं प्रवाशांची ही नाराजी दुर करण्यासाठी बारा डबा वातानुकूलित लोकल चालवण्याऐवजी अर्ध वातानुकूलित लोकल चालण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. पश्चिम रेल्वेनं १२ डब्यांच्या सामान्य लोकलचे ६ डबे एसी डब्ब्यांना जोडून त्याची चाचणी घेण्याचं ठरवल आहे.

२ प्रस्ताव विचारात

याचबरोबर ३ डबे वातानुकूलित आणि ९ डबे विनावातानुकूलित व १५ डबा लोकलमधील ९ डबे विनावातानुकूलित आणि ६ डबे वातानुकूलित असे २ प्रस्ताव विचारात होते. हे तिन्ही प्रस्ताव रेल्वेच्या रिसर्च डिजाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेनकडं (आरडीएसओ) मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये वातानुकूलित लोकलसाठी यंत्रणा बनवणाऱ्या भेल कंपनीचीही मंजुरी आवश्यक होती.

लोकल चाचणी

या ३ प्रस्तावामधील प्रथम १२ डब्यांपैकी ६ डबे वातानुकूलित असलेल्या अर्ध वातानुकूलित लोकल चाचणीला मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित पर्याय तांत्रिक कारणांमुळं स्वीकारता येत नाही आहेत. अर्ध वातानुकूलित लोकलची चाचणी जानेवारी महिन्यात होणार आहे. या चाचणीनंतरच अर्ध वातानुकूलित लोकल चालवणं शक्य आहे का हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.



हेही वाचा -

पदव्युत्तर परीक्षेसाठी नजिकचं केंद्र निवडणं अशक्य

मुंबईत कमाल तापमानाचा पारा घसरला, गारठा वाढला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा