Advertisement

मुंबईत कमाल तापमानाचा पारा घसरला, गारठा वाढला

नववर्षाच्या पहिल्याच रात्री गारठा वाढल्यानं उबदार कपडे घालून बाहेर पडणं मुंबईकरांनी पसंत केलं.

मुंबईत कमाल तापमानाचा पारा घसरला, गारठा वाढला
SHARES

डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली. नववर्षाच्या पहिल्याच रात्री गारठा वाढल्यानं उबदार कपडे घालून बाहेर पडणं मुंबईकरांनी पसंत केलं. मुंबईत मंगळवारी रात्रीपासून किमान तापमान घसरला असून, कमाल तापमानाचा पारा बुधवारी सरासरीहून कमी होता. सांताक्रूझ इथं कमाल तापमान सरासरीहून २.२ अंशांनी कमी होतं. तसंच, कुलाबा इथं १.७ अंशांनी कमी होतं.

२ अंशांची घट

कुलाबा इथं मंगळवारी सरासरीहून २ अंशांची घट नोंदवत किमान तापमान १७ अंश नोंदवलं गेलं होतं. वरळी इथं सर्वात जास्त म्हणजे २०.१९ अंश किमान तापमानाची बुधवारी नोंद झाली. विद्याविहार, अंधेरी इथं १७ अंशांहून अधिक, तर वांद्रे-कुर्ला संकुल इथं १६.२७ अंश सेल्सिअस किमान तापमान होतं.

कमी किमान तापमान

राज्यात नाशिकमध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये १०.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होतं. दरम्यान मुंबईत गारठा वाढल्यानं अनेकांनी पर्यटन स्थळी जाण्याचे बेत आखण्यास सुरूवात केली असून, अनेकांनी महाबळेश्वर, माथेरान अशा थंड वातावरणाच्या ठिकाणी हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.हेही वाचा -

New Year: नववर्षाच्या रात्री 'इतक्या' मद्यपी चालकांवर कारवाई

गुरूवारी खातेवाटप होणार जाहीर: अजित पवारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा