Advertisement

पदव्युत्तर परीक्षेसाठी नजिकचं केंद्र निवडणं अशक्य

पदव्युत्तर परीक्षा देण्यासाठी नजिकचं केंद्र निवडता येणार नाही आहे.

पदव्युत्तर परीक्षेसाठी नजिकचं केंद्र निवडणं अशक्य
SHARES

मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर परीक्षेसाठी विद्यार्थी कॉलेजच्या नजीकच केंद्र निवडणं पसंत करतात. परीक्षेला उशिर होऊ नये यासाठी अर्ज भरताना कॉलेजांची निवड केली जाते. परंतु, यानंतर पदव्युत्तर परीक्षा देण्यासाठी नजिकचं केंद्र निवडता येणार नाही आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसानं होणार असून, त्यांच्या अधिक वेळ वाया जाणार आहे. परिणाम अभ्यास करण्यास अडथळे येण्याची शक्यता आहे.

नजिकच्या कॉलेजांची निवड

मुंबई विद्यापीठाच्या या नव्या निर्णयाबाबत सर्व कॉलेज व विद्यापीठाच्या विभागांसाठी नोटीस काढण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नजिकच्या कॉलेजांची निवड करता येणार नाही या मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाला विद्यार्थी कायदा परिषदनं (स्टूडंट लॉ काउंसिल) विरोध केला आहे. विद्यार्थी कायदा परिषदेनुसार, मुंबई विद्यापीठानं कोणतेही नवे बदल करण्याबाबत शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अधिसूचना द्यायला हवी. ज्यामुळं विद्यार्थी परीक्षेकरीता योग्य ती तयारी करतील. तसंच, पसंतीचं कॉलेजची निवड करतील.

जागरूकता निर्माण करणं

मुंबई विद्यापीठानं असे निर्णय घेण्यापूर्वी जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळं विद्यार्थी आपल्या घराजवळीच कॉलेजची निवड करतील व त्यांना अभ्यासामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत. तसंच, विद्यार्थी कायदा परिषद कुलगुरू व राज्यपाल यांना पत्राद्वारे हा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार असल्याचं विद्यार्थी कायदा परिषदेचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितलं.



हेही वाचा -

गुरूवारी खातेवाटप होणार जाहीर: अजित पवार

मुंबईत कमाल तापमानाचा पारा घसरला, गारठा वाढला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा