क्रिकेटविश्वातील सध्याचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली याने नुकताच १० हजार धावांचा 'माइलस्टोन' गाठला आहे. यामुळे जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. विराटचे फॅन्स तर त्याच्यावर जाम खूश आहेत. विराटचं कौतुक करणाऱ्यांमध्ये आता मुंबई पोलिस दलही सामील झालं आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून विराटला १० हजार मनसबदारी शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये नाबाद १५७ धावा केल्या. या धावा करतानाच त्याने अनेक वर्ल्ड रेकाॅर्डही आपल्या नावे केले. यामध्ये सर्वात खास होतं १० हजार रन्सच्या क्लबमध्ये सामील होणं. १० हजार रन्स बनवणारा विराट भारताचा ५ वा फलंदाज ठरला आहे. एवढंच नाही, तर त्याने सर्वात कमी मॅचमध्ये १० हजार रन्स बनवण्याचा सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकाॅर्डही आपल्या नावे केला आहे. सचिनने १० हजार रन्स बनवण्यासाठी २५९ इनिंग खेळला होता. तर विराटने केवळ २०५ इनिंग्जमध्येच हा पल्ला गाठला आहे.
मुंबई पोलिसांनी आपल्या शैलीत विराटला शुभेच्छा देताना ट्विट केलं आहे की, या ओव्हर-स्पीडसाठी तुमचं कुठलंही चलान कापण्यात येणार नाही. केवळ शाबासकी आणि भविष्यासाठी शुभेच्छा मिळतील! या कामगिरीसाठी खूप अभिनंदन!!
मुंबई पोलिसांनी केलेल्या या ट्विटला विराट कोहलीच्या फॅन्सकडूनही पसंतीची पावती मिळत आहे.
हेही वाचा-
सचिनचा विक्रम विराटच्या नावावर; वन डे मध्ये १० हजार धावा पूर्ण
परदेश दौऱ्यावर नेता येईल पत्नी, प्रेयसी, विराटच्या मागणीला बीसीसीआयचा होकार