रहाणे, पृथ्वी शॉ मुंबईच्या संघात

मुंबई रणजी संघाच्या १५ सदस्यीय संघात अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शाॅ यांचा समावेश करण्यात आला आहे.  मिलिंद रेगे यांच्या नेतृत्त्वातील निवड समितीने या दोघांची निवड केली आहे. मात्र, दोघांच्या समावेशाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 

९ डिसेंबरपासून रणजी चषक २०१९-२० ला सुरुवात होत आहे. सूर्यकुमार यादव मुंबई रणजी संघाचा कर्णधार आहे. तर आदित्य तरे यष्टीरक्षक असणार आहे.  मुंबई आपला पहिला सामना बडोद्याविरुद्ध खेळणार आहे. श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.  रणजी चषकाच्या निमित्ताने पृथ्वी शॉला पुनरागमनाची मोठी संधी असेल. खोकल्यासाठी प्रतिबंधित औषधाचं अनावधानाने सेवन केल्यामुळे त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. भारतीय संघात समावेश होण्यासाठी त्याला चांगली खेळी करण्याची आवश्यकता आहे. 

मुंबईचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जय बिस्सा, शुभम रंजन, आकाश पारकर, सरफराज खान, शम्स मुलानी, विनायक भोईर, शशांक अत्तारडे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी,  एकनाथ केरकर 


हेही वाचा -

भारतात पुन्हा मॅच फिक्सिंग - सौरव गांगुली


पुढील बातमी
इतर बातम्या