Advertisement

भारतात पुन्हा मॅच फिक्सिंग - सौरव गांगुली

भारतातील मॅच फिक्सिंग संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. भारतात अजूनही मॅच फिक्सिंग सुरू असल्याचं समोर आलं आहे.

भारतात पुन्हा मॅच फिक्सिंग - सौरव गांगुली
SHARES

भारतातील मॅच फिक्सिंग संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. भारतात अजूनही मॅच फिक्सिंग सुरू असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच आता मॅच फिक्सिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. 

भारतामध्ये मॅच फिक्सिंग अजूनही संपलेली नाही, असं गांगुली यांनी म्हटलं आहे.  नुकते भारतामध्ये ट्वेन्टी-२० स्पर्धा झाली. या स्पर्धेत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला असल्याचं गांगुली यांनी मान्य केलं आहे. याबाबत गांगुली म्हणाले की, भारतामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा झाली होती. यावेळी सट्टेबाजाने एका खेळाडूशी संपर्क साधला होता. हा सट्टेबाज नेमका कोण आहे, हे मात्र समजू शकलं नाही. मात्र ही फार वाईट गोष्ट असून हे कसं रोखता येईल, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी खेळ आणि खेळाडूंची प्रतिमा जपण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. जो खेळाशी प्रतारणा करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. वयचोरी केलेल्या एका खेळाडूवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. हा खेळाडू आपला जन्म १२ डिसेंबर २००१ या दिवशी झाल्याचे सांगत होता. त्यानुसार तो १९ वर्षांखालील संघात खेळत होता. पण त्याच्या शाळेतील दाखल्यामध्ये १० जून १९९६ ही जन्मतारीख होती.   त्यामुळे त्याच्यावर आता तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या खेळाडूचे नाव प्रिन्स राम निवास यादव असे आहे. हा खेळाडू दिल्लीच्या संघातून खेळत होता. त्याचबरोबर या खेळाडूने दहावीची परीक्षाही पास केलेली होती. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा