अजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

राजस्थान राॅयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला स्लो अोव्हर रेट राखल्याप्रकरणी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात अाला अाहे. वानखेडे स्टेडियमवर रविवारी रात्री रंगलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात षटकांती गती कमी राखल्याबद्दल त्याला हा दंड सुनावला अाहे.

मुंबई इंडियन्सवर केली मात

रहाणेच्या नेतृत्वाखालील राजस्थान राॅयल्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सनी मात करत अायपीएलमधील अापले अाव्हान कायम ठेवले अाहे. या सामन्यात जोस बटलर यानं नाबाद ९४ धावांची तुफानी खेळी करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचं हे यंदाच्या अायपीएलमधील सलग पाचवं अर्धशतक ठरलं.

वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला दंड सुनावण्यात अाला. अायपीएलच्या अाचारसंहितेनुसार त्याचा हा पहिला गुन्हा होता. त्यामुळे त्याच्या मानधनातून १२ लाख रुपये कापण्यात अाले अाहे.

- अायपीएल प्रसिद्धीपत्रक


हेही वाचा -

बटलरचा धमाका, राजस्थान ‘अजिंक्य’, मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात

इशान किशनने वाजवली कोलकाताची ‘पुंगी’, मुंबई इंडियन्सचा १०२ धावांनी विजय

पुढील बातमी
इतर बातम्या