Advertisement

बटलरचा धमाका, राजस्थान ‘अजिंक्य’, मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात


बटलरचा धमाका, राजस्थान ‘अजिंक्य’, मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात
SHARES

दोन मुंबईकर कर्णधारांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या ‘करो या मरो’ सामन्यात अखेर अजिंक्य रहाणे सरस ठरला. बाद फेरीत मजल मारण्यासाठी विजय आवश्यक असताना मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सकडून सात विकेट्सनी पराभूत व्हावे लागले. मुंबई इंडियन्सचे १७९ धावांचे लक्ष्य जोस बटलरच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानने १२ चेंडू राखून पार करत आपल्या बाद फेरीच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत. मुंबई इंडियन्सची १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर घसरण झाल्यामुळे गतविजेत्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.


बटलर-रहाणेची सुरेख भागी

मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेले १६९ धावांचे आव्हान पार करताना पहिल्याच षटकांत राजस्थान रॉयल्सचा पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराने डार्सी शॉर्टला यष्टीरक्षक इशान किशनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र जोस बटलर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी राजस्थान रॉयल्सचा डाव सावरत पहिल्या विकेटसाठी शानदार भागीदारी रचली. रहाणे आणि बटलर यांनी मुंबईच्या गोलंदाजांना आणखी यश न मिळवून देता दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावा जोडल्या.


बटलरचा घणाघात

अजिंक्य रहाणे ३७ धावांवर बाद झाल्यानंतर बटलरचा घणाघात पाहायला मिळाला. मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: कत्तल करत बटलरने आपली ताकद दाखवून दिली. त्याने ५३ चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ९४ धावा फटकावत राजस्थान रॉयल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मैदानात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या बटलरला संजू सॅमसन यानेही मोलाची साथ दिली. त्याने २६ धावांचे योगदान दिले.



इर्विन लुइसची दमदार सुरुवात

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि इर्विन लुइस यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने योगदान देणाऱ्या सूर्यकुमारने ३१ चेंडूंत ३७ धावा केल्या. बऱ्याच काळानंतर मोठी खेळी करणाऱ्या लुइसने ४२ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६० धावा फटकावल्या.


मुंबईची मधली फळी गडगडली

एका चांगल्या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या रचण्याची संधी होती. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर खातेही न खोलता जेफ्रा आर्चरची शिकार ठरला. इशान किशन (१२) आणि कृणाल पंड्या (३) यांनीही सपेशल निराशा केली. हार्दिक पंड्याने २१ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकार ठोकत ३६ धावा केल्यामुळे मुंबईला ६ बाद १६८ धावांपर्यंतच झेप घेता आली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा