अर्जुन तेंडुलकरचा टीम इंडियासोबत लंडनमध्ये सराव

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

सध्या भारतीय संघ अायर्लंड अाणि इंग्लंड दौऱ्यासाठी लंडनमध्ये दाखल झाला अाहे. मंगळवारी भारतीय संघानं इंग्लंडमध्ये पहिल्यांदा सराव केला. पण या सर्वांमध्ये एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तो म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा. वेगवान गोलंदाज असलेल्या अर्जुन तेंडुलकरनं विराट कोहलीच्या शिलेदारांना चांगलाच सराव दिला. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 'वर्डस अाॅफ विस्डम' अशा शब्दांत अर्जुनची स्तुती केली अाहे.

 

U-19 संघात निवड

जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी अर्जुन तेंडुलकरची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड करण्यात अाली अाहे. अंडर-१९ संघाचा सराव बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत सुरू होईल, त्याअाधी अर्जुन भारतात परत येणार अाहे.

याअाधीही भारत, इंग्लंडसोबत सराव

भारतीय संघासोबत अर्जुन सराव करत असताना अनेक वेळा पाहायला मिळालं अाहे. गेल्या वर्षी त्याने इंग्लंड संघासोबतही सराव केला होता. त्याचबरोबर गेल्या वर्षी वानखेडे स्टेडियमवरही विराट कोहली अाणि अन्य सहकाऱ्यांसोबत अर्जुनने सराव केला होता.

 

अर्जुनच्या इंग्लंडवारीवर टीका

अर्जुनची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली असताना तो भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये सराव सका करू शकतो. सचिनचा मुलगा म्हणून अर्जुनसाठी बीसीसीअाय पायघड्या का पसरत अाहे, यामुळे अर्जुनची कारकीर्द धोक्यात येऊ शकते, अशाप्रकारची टीका सध्या अर्जुनच्या इंग्लंडवारीवर होत अाहे.


हेही वाचा -

'ज्युनियर तेंडुलकर'ची श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या U-19 संघात निवड

अर्जुन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगमधून माघार


पुढील बातमी
इतर बातम्या