Advertisement

'ज्युनियर तेंडुलकर'ची श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या U-19 संघात निवड


'ज्युनियर तेंडुलकर'ची श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या U-19 संघात निवड
SHARES

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या अागामी दौऱ्यासाठी भारताच्या U-19 संघात निवड झाली अाहे. जुलैमध्ये होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ दोन चारदिवसीय सामने अाणि पाच एकदिवसीय सामने खेळणार अाहे. अर्जुन मात्र चारदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार अाहे. मात्र त्याला वनडे संघात स्थान मिळवता अालं नाही.


अर्जुन U-19 संघाचा महत्त्वाचा भाग

सध्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाची बांधणी सुरू असून या संघाचा झोनल क्रिकेट अकादमी (झेडसीए) येथे सराव सुरू असून ते उना येथे सराव सामनेही खेळत अाहेत. अाशिष कपूर, ग्यानेंद्र पांडे अाणि राकेश पारीख हे भारताचे U-19 संघाचे निवड सदस्य अाहेत.


या खेळाडूंकडे असेल नेतृत्व

भारतीय संघ या दौऱ्यासाठी पुढील महिन्यात श्रीलंकेला रवाना होणार अाहे. दिल्लीचा यष्टीरक्षक-फलंदाज अनुज रावत याच्याकडे चारदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात अाले अाहे. वनडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा उत्तर प्रदेशच्या अार्यन जुयल याच्याकडे असेल.


हेही वाचा -

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ संघात निवड

अर्जुन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगमधून माघार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा