Advertisement

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ संघात निवड


अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ संघात निवड
SHARES

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची मुंबई अंडर-१९ संघात निवड झाली आहे. अर्जुन जे. वाय. लेले वनडे टुर्नामेंटमध्ये मुंबई संघाकडून खेळणार आहे. ही स्पर्धा बडोद्यात १६ ते २३ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

अर्जुन सध्या १७ वर्षांचा आहे. तो याआधी देखील मुंबईच्या १४ आणि १७ वर्षांखालील संघातून खेळला आहे. अर्जुन सध्या जलद गोलंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या गोलंदाजीची सर्वत्र चर्चा देखील सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरेस्टो त्याच्या यॉर्करवर दुखापतग्रस्त झाला होता. सरावादरम्यान अर्जुनने जाॅनीला नेटमध्ये गोलंदाजी केली होती. सचिन देखील अर्जुनाच्या गोलंदाजीकडे विशेष लक्ष देत आहे.

मुंबईच्या १९ वर्षांखाली संघात अंजदीप लाड, वेदांत मुरकर, अर्जुन तेंडुलकर, सागर चबेरीय, दिव्यांग सक्सेना, सत्यलक्ष्य जैन, अभिमन्यू विशिष्ट, तानुष कोटीयन, शोएब खान, ध्रुव ब्रीड, नकुल मेहता, अग्नी चोप्रा, भुपेन लालवानी, फरहान काजी, सक्षम पराशर, अथर्व अनकोलेकर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसुजा यांचा समावेश आहे.



हे देखील वाचा -

सचिनचं स्वप्न अर्जुन पूर्ण करेल - ग्लेन मॅकग्रा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा