सचिनचं स्वप्न अर्जुन पूर्ण करेल - ग्लेन मॅकग्रा

Mumbai
सचिनचं स्वप्न अर्जुन पूर्ण करेल - ग्लेन मॅकग्रा
सचिनचं स्वप्न अर्जुन पूर्ण करेल - ग्लेन मॅकग्रा
सचिनचं स्वप्न अर्जुन पूर्ण करेल - ग्लेन मॅकग्रा
See all
मुंबई  -  

सचिनचं स्वप्न त्याचा मुलगा पूर्ण करेल...अर्जुन तेंडुलकरबद्दल ही भविष्यवाणी वर्तवली आहे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने. आता तुम्ही म्हणाल की सचिनचं असं कोणतं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे, जे त्याचा मुलगा पूर्ण करणार आहे? मुंबई रणजीच्या अंडर 23 आणि अंडर 19 क्रिकेट संघाच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत आलेल्या मॅकग्राने याचा खुलासा केला आहे.

मॅकग्राने यावेळी अर्जुन तेंडुलकरचं भरपूर कौतुक केलं. यावेळी बोलताना मॅकग्रा म्हणाला, 'वेगवान गोलंदाज बनण्याचं सचिनचं स्वप्न होतं. पण त्याच्या कमी उंचीमुळे त्याला ते शक्य झालं नाही. पण सचिनचा मुलगा अर्जुनची उंची त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सचिनचं हे स्वप्न अर्जुन पूर्ण करेल.' अर्जुन गोलंदाजी कसा करेल, याविषयी आपल्याला उत्सुकता आहे, असंही मॅकग्रा यावेळी म्हणाला.

यावेळी भारतीय गोलंदाज उमेश यादवचंही मॅकग्राने कौतुक केलं. 'उमेश यादव हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. प्रत्येक सामन्यागणिक त्याच्यात बदल होत आहेत. तुम्ही किती वेळ गोलंदाजी करु शकता हे महत्त्वाचं असतं. उमेश यादव यावरच लक्ष केंद्रीत करुन आत्मविश्वासाने गोलंदाजी करत आहे', असे मॅकग्रा यावेळी म्हणाला.हेही वाचा

जग जिंकणारा दादरचा आयर्नमॅन!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.