स्मिथ, वाॅर्नरची अायपीएलमधून हकालपट्टी

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

चेंडूशी छेडछाड (बाॅल टेम्परिंग) केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ अाणि डेव्हिड वाॅर्नर यांची यंदाच्या अायपीएलमधून बीसीसीअायनं हकालपट्टी केली अाहे. क्रिकेट अाॅस्ट्रेलियाने या दोघांवर १२ महिन्यांसाठी अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची बंदी घातल्यानंतर बीसीसीअायनंही या दोघांना अायपीएलमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय घेतला अाहे.

काय अाहे प्रकरण?

केपटाऊन इथं झालेल्या दक्षिण अाफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अाॅस्ट्रेलियाचा कॅमेरून बॅनक्राॅफ्ट हा बाॅल टेम्परिंग करताना अाढळला होता. बॅनक्राॅफ्टनं खिशातून पिवळा कागद काढून चेंडू घासला होता. त्याचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं. मात्र त्याच्या या कृत्यात तो एकटा सहभागी नव्हता. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वाॅर्नर अाणि बॅनक्राॅफ्ट यांनी ठरवून हे कृत्य केलं होतं. या सर्वांनीच याची कबुली दिली अाहे. बॅनक्राॅफ्टवरही क्रिकेट अाॅस्ट्रेलियानं ९ महिन्यांची बंदी लादली अाहे.

बीसीसीअायचीही त्वरीत कारवाई

क्रिकेट अाॅस्ट्रेलियाने स्मिथ अाणि वाॅर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घातल्यानंतर बीसीसीअायनंही त्वरीत कारवाई करत या दोघांना एका वर्षासाठी अायपीएलमध्ये खेळू न देण्याचा निर्णय घेतला. बीसीसीअायच्या प्रशासकीय समितीचे कार्यकारी अध्यक्ष सी.के. खन्ना, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी अाणि अायपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी या प्रकरणी चर्चा करून स्मिथ, वाॅर्नर यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बीसीसीअायने राजस्थान राॅयल्स अाणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना त्यांच्या जागी बदली खेळाडू निवडण्यास सांगितले अाहे.


हेही वाचा - 

अायपीएलच्या उद्घाटनाला ६ कर्णधार राहणार गैरहजर

अाता अायपीएलमध्ये डीअारएसच्या अवलंब होणार

पुढील बातमी
इतर बातम्या