माहीम ज्युवेनाईल टी-२० महिला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

क्रिकेटपटू स्व.प्रकाश पुराणिक स्मृती चषक माहीम ज्युवेनाईल टी-२० क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवाजी पार्क मैदानात या आयोजित आहेत. माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब आणि शिवाजी पार्क जिमखानातर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  (Mahim Juvenile T20 Women's Cricket Tournament)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारीला झाले. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक उपस्थित होते. तर १८ तारखेला होणाऱ्या अंतिम मॅचसाठी MCA चे अध्यक्ष अमोल काळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप वेंगसरकर उपस्थित राहणार आहेत. 

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या स्मरणार्थ प्रथमच माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबद्वारे महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्गज क्रिकेटपटूसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी पार्क मैदानाची ओळख भविष्यात महिला क्रिकेट खेळाडूंद्वारे व्हावी हा देखील या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू आहे.

‘या’ संघांचा समावेश

  • शिवाजी पार्क यंगस्टर्स
  • माटुंगा जिमखाना
  • पय्याडे स्पोर्ट्स क्लब
  • स्पोर्ट्स फिल्ड सीसी
  • फोर्ट यंगस्टर्स
  • कामत मेमोरियल
  • डीपीसी
  • एमआयजी सीसी
  • स्पोर्टिंग युनियन दादर
  • स्पोर्टिंग क्लब ठाणे
  • राजावाडी सीसी
  • पीडीटीएसए
  • दहिसर एससी
  • गौड युनियन

एकूण 16 टीम यात सहभागी झाल्या आहेत. अंतिम विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषकाने गौरवण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर आदी पुरस्कार देखील दिले जाणार आहेत.

कधी - १४ ते १८ फेब्रुवारी

कुठे - माहिम जुव्हेनाईल स्पोर्ट्स क्लब

वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून 


हेही वाचा

मुंबई : वानखेडे स्टेडिअमवर ‘द प्रेसिडेंट चषक’ महिला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

पुढील बातमी
इतर बातम्या