Advertisement

मुंबई : वानखेडे स्टेडिअमवर ‘द प्रेसिडेंट चषक’ महिला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

सर्व सामने फेसबुक आणि यूट्यूबवर थेट प्रक्षेपित केले जातील.

मुंबई : वानखेडे स्टेडिअमवर  ‘द प्रेसिडेंट चषक’ महिला क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
SHARES

बहुप्रतिक्षित महिला IPL लिलावापूर्वी, मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) द्वारे आयोजित महिलांसाठी ‘द प्रेसिडेंट्स कप’ नावाची टॅलेंट एक्सपोजर स्पर्धा आजपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झाली आहे. मुंबईच्या महिला क्रिकेटपटूंची प्रतिभा सर्व महिला फ्रँचायझींच्या टॅलेंट स्काउट्सला दाखवण्यासाठी हे केले जात आहे.

सर्व सामने फेसबुक आणि यूट्यूबवर थेट प्रक्षेपित केले जातील.

क्रिकेटमधील महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यावर बोलताना, MCA चे मानद सचिव, अजिंक्य नाईक म्हणाले, “भारतातील उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य संघटनेने आयोजित केलेली ही एकमेव स्पर्धा आहे. परंतु क्रिकेटमध्ये पुरुषांच्या असलेल्या वर्चस्वाबद्दल सर्वांनाच माहित आहे. पण अषा परिस्थितीतही महिलांनी आपल्या कामगिरीची जादू दाखवली आहे. ही परंपरा अशीच रहावी यासाठी ‘द प्रेसिडेंट्स चषक’चे आयोजन करण्यात आले आहे.

“बीसीसीआयने महिला आयपीएल आयोजित करून आणि 13 फेब्रुवारी रोजी लिलाव करून मोठी झेप घेतल्याने,  प्रतिभा दर्शविणारी ही राज्य संघटनेची एकमेव स्पर्धा असेल. बीसीसीआय फ्रँचायझी धारकांच्या सर्व फ्रँचायझींना सामने पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.”

BCCI च्या नियमांनुसार, हा T20 फॉरमॅट आहे आणि 4 संघांमध्ये रॉबिन राऊंड लीगच्या आधारावर खेळला जातो.

कधी आणि किती वाजता?

दररोज दोन सामने, अनुक्रमे दुपारी 2:00 आणि संध्याकाळी 6:00 वाजता होतील. 10 फेब्रुवारी 2023 रोजी अंतिम फेरी होणार आहे. सामने 7,8,9 आणि 10 फेब्रुवारी रोजी खेळवले जातील.

प्रेसिडेंट्स कप

एमसीएने आयोजित केलेली ही सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे. महिलांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळतील.

मुंबई युनिकॉर्न्स, मुंबई थंडर्स, मुंबई ब्लास्टर्स, मुंबई वॉरियर्स हे संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. विजेत्या संघाला चकचकीत करंडक, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.हेही वाचा

क्रिकेटचे नियम बदलले

वुमन्स प्रीमियर लीगमधील 5 संघाचा लिलाव, 'या' संघाला लागली सर्वाधिक बोली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा