Advertisement

वुमन्स प्रीमियर लीगमधील 5 संघाचा लिलाव, 'या' संघाला लागली सर्वाधिक बोली

यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश असेल.

वुमन्स प्रीमियर लीगमधील 5 संघाचा लिलाव, 'या' संघाला लागली सर्वाधिक बोली
SHARES

पुरुष आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या महिला इंडियन प्रीमियर लीगचं नाव वुमन्स प्रीमियर लीग असं करण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय महिला इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत पाच संघ असतील, हेही स्पष्ट झाले.

यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश असेल. या संघाचा आज लिलाव झाला. यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी रुची दाखवली. बीसीसीआयनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अदानी ग्रुपने अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बेंगलोरच्या संघ विकत घेतला आहे. या संघासाठी त्यांनी मोठी रक्कम मोजली आहे.

'इतकी' लागली बोली

वुमन्स प्रीमियर लीगमधील पाच संघाचा आज लिलाव झाला. अहमदाबाद संघाला सर्वाधिक बोली लागली होती.

  • अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला 1289 कोटी रुपयांत खरेदी केलं.
  • इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला 912.99 कोटी रुपयांत खरेदी केलं.
  • महिला आयपीएलमधील तिसऱ्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघानं खरेदी केलंय.
  • आरसीबीनं बेंगलोरसाठी 901 कोटी रुपये मोजलेत.
  • तर दिल्लीच्या संघाला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 810 कोटी रुपयांत खरेदी केलं.
  • कापरी ग्लोबल होल्डिंग्स यांनी लखनौच्या महिला संघासाठी 757 कोटी रुपये मोजले आहेत.
  • वुमन्स प्रीमियर लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत 4669.99 कोटी रुपये इतकी झाली आहे.

पुरुष आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला IPLची सुरुवात केली आहे. वुमन्स प्रीमियर लीग याच वर्षी मार्च या महिन्यात सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार मार्च ते 26 मार्च या कालावधीत वुमन्स प्रीमियर लीग ही स्पर्धा होणार आहे.हेही वाचा

International Womens Day 2022 : ५५व्या वर्षीही बॉडीबिल्डींगमध्ये ‘तिचा’ डंका

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा