Advertisement

क्रिकेटचे नियम बदलले, 1 ऑक्टोबरपासून 'हे' 8 नियम लागू

मंगळवारी या नियमांना मंजुरी देण्यात आली.

क्रिकेटचे नियम बदलले, 1 ऑक्टोबरपासून 'हे' 8 नियम लागू
SHARES

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(ICC) खेळाच्या काही नियमांत (New Rules) बदल केले आहेत. हे बदल सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील मेन्स क्रिकेट कमिटीच्या शिफारशींच्या आधारावर मुख्य कार्यकारी समितीकडे पाठवले होते. मंगळवारी या नियमांना मंजुरी देण्यात आली.

नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. म्हणजे, ऑस्ट्रेलियात होणारी टी20 विश्व चषक स्पर्धा या नियमाअंतर्गत खेळली जाईल.

१) स्ट्राइकवर नवा फलंदाजच
एखादा फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाजच स्ट्राइकवर येईल, त्यात दोन्ही फलंदाजांनी क्रीज बदलली असली तरी.

२) थुंकी कायमस्वरूपी बंदी
चेंडूला चकाकी आणण्यासाठी थुंकिच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी राहील. कोविड काळात यावर तात्पुरती बंदी होती.

३) मांकडिंग आता सामान्य धावबाद
मांकडिंगला अनफेअर प्ले सेक्शनमधून रन आऊट सेक्शनमध्ये रूपांतरित केले आहे. याचा अर्थ मांकडिंग सामान्य धावबाद असेल.

४) टाइम आउटच्या वेळेत बदल
एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात नव्या फलंदाजाकडे मैदान येऊन क्रिजवर उभे राहण्यासाठी तीन मिनिटांऐवजी केवळ दोन मिनिटांचा अवधी असेल. एखादा खेळाडू २ मिनिटांत न आल्यास टाइम आउट मानले जाईल. टी२० मध्ये हा नियम आधीपासूनच ९० सेकंद आहे.

५) 5 धावांची पेनल्टी
एखाद्या गोलंदाजाच्या रनअपदरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडू जाणीवपूर्वक जागा बदलत असेल तर ती अयोग्य वर्तणूक मानत पंच फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा देऊ शकतो. पंच त्या डेड बॉलही जाहीर करू शकतो.

6) खेळपट्टीच्या आतच शॉट खेळावा लागेल

शॉट खेळताना फलंदाजाची बॅट किंवा शरीर पिचच्या बाहेर जात असेल तर त्यावर धाव ग्राह्य धरली जाणार नाही. चेंडू डेड बॉल होईल. सामन्यात एखादा चेंडू फलंदाजाला पिचबाहेर जाण्यास भाग पाडत असेल तर तो नो बॉल होईल.

7) फलंदाज स्ट्राइक एंडवर चेंडू थ्रो केल्यास डेड बॉल

सुरुवातीस एखादा फलंदाज गोलंदाज क्रीजपर्यंत पोहोचण्याआधी पुढे जात असेल तेव्हा त्याला थ्रो फेकून धावबाद करू शकत होता. आता त्यास डेड बॉल मानले जाईल.

8) 30 यार्डच्या कक्षेत अतिरिक्त क्षेत्ररक्षक
टी-20 प्रमाणे वनडेतही संघांना निश्चित वेळेत षटक संपवावे लागेल. उशीर झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त फील्डर 30 यार्डाच्या कक्षेत आणावा लागेल. हा नियम आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग 2023 नंतर लागू होईल.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा