IPL 2021 : वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफपैकी आणखी दोघांना कोरोना

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) अनेक आव्हानांना सामोर जावं लागत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी आणखी दोघांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसंच या स्टेडियममध्ये प्लम्बिंगचे काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे.

मागील शनिवारी याच स्टेडियमवरील ग्राऊंड स्टाफपैकी १० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळं आता बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची चिंता वाढली आहे. वानखेडेवर यंदाच्या आयपीएलचे १० सामने होणार आहेत. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, इतर दिवशी नाईट कर्फ्यू असणार आहे. मात्र, असं असलं तरी मुंबईत आयपीएलचे सामने ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी व्यक्त केला होता. परंतु, आता ग्राऊंड स्टाफपैकी बऱ्याच जणांना कोरोनाची बाधा झाल्यानं मुंबईमधील सामन्यांवर प्रश्नचिन्ह आहेत.


हेही वाचा -

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक


पुढील बातमी
इतर बातम्या